नाशिक हादरलं ! गरबा चालू असताना बाचाबाची झाली नंतर काय घडलं ऐकून अंगावरच काटा येईल…
उपनगर पोलीसांनी गुन्हा दाखल करून घेताच संशयित आरोपींना ताब्यात घेत अटक केली असून त्यात चौघांपैकी तिघे अल्पवयीन आहेत.
नाशिक : नाशिकमध्ये (Nashik) नवरात्र उत्सवाला (Navratri Festival) गालबोट लागलंय. मंगळवारी डीजे ऑपरेटरचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच सकाळी एका तरुणाचा मृत्यू (Death) झाल्याची बाब समोर आली आहे. मंगळवारी रात्री त्याच्यावर चौघांनी धारधार शस्राने वार करत तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. जवळच असलेल्या एका खाजगी रुग्णालयात तो स्वतः उपचारासाठी गेला होता मात्र त्याचवेळी तो खाली कोसळला होता. त्याच्यावर रात्रभर उपचार सुरू होते. मात्र त्याचा सकाळच्या वेळी दुर्दवी मृत्यू झाला आहे. गरबा खेळत असतांना बाचाबाची नंतर हा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले असून उपनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दखल करण्यात आला आहे. चौघांना उपनगर पोलीसांनी अटक केली असून त्यात तीन अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याने खुनाच्या घटनेची मोठी चर्चा होत आहे.
नाशिकच्या उपनगर परिसरात शिवाजीनगर परिसरात नवरात्रीच्या निमित्ताने गरब्याचे आयोजन करण्यात आले होते.
गरबा खेळत असतांना धक्का लागल्याने बाचाबाची झाली त्यानंतर त्यांच्यात झटापट देखील झाली होती.
त्यानंतर चौघांनी यामध्ये एकाला बाजूला घेऊन जात धारधार शस्राने वार केल्याचे समोर आले त्यानंतर त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
उपनगर पोलीसांनी गुन्हा दाखल करून घेताच संशयित आरोपींना ताब्यात घेत अटक केली असून त्यात चौघांपैकी तिघे अल्पवयीन आहेत.
या प्रकरणात बबलू लोट या तरुणाची हत्या झाली असून तो द्वारका परिसरातील महालक्ष्मी चाळ येथे राहणारा होता.
बबलू लोट हा त्याचा मित्र अनिकेत शिंदे याच्यासमवेत गरबा खेळण्यासाठी आला होता. गरबा खेळत असताना अनिकेत यास अल्पवयीन मुलाचा धक्का लागला.
त्यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली आणि दांडिया संपल्यानंतर जमलेले नागरिक घरांकडे परतत असतांना बबलू याला अल्पवयीन मुलांनी जाब विचारला.
यावरून बबलू याने मारहाण केली त्यानंतर अल्पवयीन मुलांनी साथीदाराच्या मदतीने बबलू याचा खून केला आहे.