सर्व तरुण क्रिकेट खेळत होते, अचानक क्रिकेटच्या मैदानात रक्तरंजित खेळ सुरु झाला, कारण काय?

मैदानात क्रिकेटची मॅच सुरु होती. तरुणांचा कल्ला सुरु होता. इतक्यात मैदानात जे घडलं त्याने मैदानात अचानक स्मशान शांतता पसरली.

सर्व तरुण क्रिकेट खेळत होते, अचानक क्रिकेटच्या मैदानात रक्तरंजित खेळ सुरु झाला, कारण काय?
क्रिकेट खेळताना क्षुल्लक वादातून तरुणाला संपवले
Follow us
| Updated on: Jun 21, 2023 | 10:45 AM

कानपूर : उत्तर प्रदेशात एक हैराण करणारी घटना उघडकीस आली आहे. सर्व तरुण क्रिकेट खेळत होते. मात्र खेळता खेळता मैदानात जे घडलं त्याने सर्वच हादरले. क्लिनबोल्ड केल्याच्या रागातून बॅटिंग करणाऱ्या तरुणाने बॉलिंग करणाऱ्या तरुणाची हत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतेदह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. कानपूर महानगरातील घटमपूर भागातील रेवन्ना परिसरात ही घटना घडली. हत्येनंतर आरोपी फरार झाला असून, त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी तीन पथकं रवाना केली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ माजली आहे.

मॅचदरम्यान क्लीन बोल्ड केल्याने हत्या

दरी गावातील मुलं रोज डेरा राठी खालसा गावात क्रिकेट मॅच खेळायला यायची. नेहमीप्रमाणे सर्व मुलं क्रिकेट खेळत होती. दरम्यान, हरगोविंद नावाचा मुलगा फलंदाजी करत होता आणि सचिन गोलंदाजी करत होता. यावेळी सचिनने वेगवान गोलंदाजी करत हरगोविंदला क्लीन बोल्ड केले आणि सेलिब्रेशन करत होता. यामुळे हरगोविंदला संताप अनावर झाला अन् त्याने सचिनला मारहाण करून थेट त्याची हत्याच केली. सचिनला जमिनीवर बेशुद्ध पडलेले पाहून हरगोविंदने तेथून पळ काढला.

आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथकं रवाना

अन्य मुलांनी गावकऱ्यांना याबाबत माहिती दिली, त्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळ गाठून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सचिनचा मृतदेह ताब्यात घेत, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. किरकोळ कारणावरून हत्येसारखे मोठे पाऊल आरोपीने उचलल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांकडून तीन पथके तयार करण्यात आली आहेत.

हे सुद्धा वाचा

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.