जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या बहिणीला कारसह पोलीस क्रेनने उचललून घेऊन जातात! काय प्रकरण?
रस्त्यात पार केलेली गाडी पोलिसांनी टोइंग व्हॅनच्या मदतीने उचलली. विशेष म्हणजे उचललेल्या गाडीमध्ये मुख्यमंत्र्यांची बहिण होती. त्यामुळे ही कारवाई चर्चेचा विषय बनली आहे.
हैदराबाद : कायद्यापुढे सर्वच सारखे असतात. कायद्याचे काटेकोर अंमलबजावणी करणारे शासनकर्ते नियम किंवा कायदा मोडणारा गुन्हेगार कोण आहे, याची तमा बाळगत नाहीत. त्यांच्यासाठी सामान्य नागरिक असो किंवा कुठला व्हीआयपीचा नातेवाईक. कारवाईच्या बाबतीत रोखठोक भूमिका घेतली जाते. हैदराबादमध्ये करण्यात आलेल्या कारवाईतून याचीच प्रचिती आली आहे. इतकेच नव्हे तर राजकारण आणि युद्धामध्ये समोरच्या शत्रूची अजिबात गय केली जात नाही. हे देखील या कारवाईतून पाहायला मिळाले आहे. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना विरोध करणाऱ्या आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या बहिणीला हैदराबाद पोलिसांनी इंगा दाखवला.
पोलिसांनी टोइंग व्हॅनच्या मदतीने उचलली कार
रस्त्यात पार केलेली गाडी पोलिसांनी टोइंग व्हॅनच्या मदतीने उचलली. विशेष म्हणजे उचललेल्या गाडीमध्ये आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची बहिण होती. त्यामुळे ही कारवाई चर्चेचा विषय बनली आहे. सोशल मीडियामध्ये देखील या कारवाईचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे.
#WATCH | Hyderabad: Police drags away the car of YSRTP Chief Sharmila Reddy with the help of a crane, even as she sits inside it for protesting against the Telangana CM KCR pic.twitter.com/ojWVPmUciW
— ANI (@ANI) November 29, 2022
पोलिसांनी शर्मिला यांना खाली उतरवण्याचा प्रयत्न केला
हैदराबाद पोलिसांनी आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या बहिणीची कार क्रेनच्या सहाय्याने उचलली. कारमध्ये मुख्यमंत्र्यांची बहीण वाय एस शर्मिला बसल्या होत्या. पोलिसांनी तिला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला.
मात्र त्या काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्यामुळे अखेर त्यांच्यासह कार क्रेनने उचलण्यात आली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांमधून तीव्र भावना उमटल्या. समर्थकांनी संपूर्ण दिवसभर या कारवाईच्या निषेधार्थ जोरदार हंगामा घातला.
ही दडपशाही आहे, असा आरोप करत समर्थकांनी हैदराबाद पोलीस तसेच तेलंगणा सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली. विशेष म्हणजे समर्थकांनी एवढा गोंधळ घालून देखील हैदराबाद पोलीसांनी आपल्या भूमिकेमध्ये अजिबात नरमाई दाखवली नाही. उलट पोलिसांनी निदर्शन करत्या समर्थकांना ताब्यात घेऊन अटकेची कारवाई देखील केली.
काय आहे प्रकरण?
आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या बहीण शर्मिला या वायएसआर तेलंगणा पार्टीच्या प्रमुख आहेत. शर्मिला यांनी तेलंगणातील मुख्यमंत्र्यांच्या धोरणाविरोधात आंदोलन उभारले होते. याच आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी त्यांनी मंगळवारी मोर्चा काढला होता.
पदयात्रेदरम्यान शर्मिला या आपल्या समर्थकांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या दिशेने चालल्या होत्या. यादरम्यान शर्मिला आणि पोलिसांमध्ये जोरदार बाजाबाचीही झाल्याचे वृत्त आहे.
पोलिसांनी शर्मिला यांना रस्त्यावरून बाजूला हटण्याची सूचना केली होती, मात्र शर्मिला यांनी पोलिसांच्या सूचनेला जुमानले नाही. त्यामुळे अखेर हैदराबाद पोलिसांनी क्रेन बोलावून शर्मिला यांची कार उचलून नेली.