AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सेट टॉप बॉक्स रिचार्जच्या कारणाने घरात प्रवेश, डेंटिस्ट महिलेची राहत्या घरी हत्या

आग्य्रातील दंतवैद्यक डॉ. निशा सिंघल यांची सुरीने गळा चिरुन निर्घृण हत्या करण्यात आली.

सेट टॉप बॉक्स रिचार्जच्या कारणाने घरात प्रवेश, डेंटिस्ट महिलेची राहत्या घरी हत्या
Follow us
| Updated on: Nov 21, 2020 | 6:31 PM

लखनौ : आग्य्रात 38 वर्षीय डेंटिस्ट महिलेची राहत्या घरी हत्या करण्यात आली. सेट टॉप बॉक्स रिचार्ज करण्याचे कारण सांगून घरी आलेल्या व्यक्तीने डॉ. निशा सिंघल (Dr Nisha Singhal) यांची हत्या केल्याचा आरोप आहे. धक्कादायक म्हणजे हत्येच्या वेळी सिंघल यांची दोन लहानगी मुलं शेजारच्या खोलीत होती. (Agra Dentist Dr Nisha Singhal Murder at home by man who entered on pretext of Set top box recharge)

उत्तर प्रदेशात दिवसाढवळ्या घडलेल्या या हत्याकांडामुळे एकच खळबळ उडाली आहे. डॉ. निशा सिंघल यांची सुरीने गळा चिरुन निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांच्या आठ आणि चार वर्षांच्या मुलांवरही हल्ल्याचा प्रयत्न झाला, मात्र सुदैवाने ती बचावली.

निशा यांचे पती डॉ. अजय सिंघल हे सर्जन आहेत. हल्ल्याच्या वेळी ती हॉस्पिटलमध्ये ड्युटी करत होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ते घरी आले. हल्ल्यात जखमी झालेल्या पत्नीला घेऊन ते हॉस्पिटलला आले, मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आले.

सीसीटीव्ही फूटेजच्या सहाय्याने पोलिसांनी शुभम पाठक नावाच्या तरुणाला शनिवारी सकाळी अटक केली. शुभमच्या बाईकचा पाठलाग करत पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. आरोपीने पोलिसांवर गोळीबार केला, प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

केबल टीव्ही तंत्रज्ञ असल्याची बतावणी करणारा शुभम चोरीच्या उद्देशाने घरात घुसल्याची माहिती आहे. पोलिसांच्या माहितीनुसार डॉ. सिंघल यांच्या हत्येनंतर तासभर तो त्यांच्या घरात होता.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी या घटनेवरुन संताप व्यक्त केला आहे. “आग्य्रातील गजबजलेल्या रहिवासी भागात महिलेची घरात घुसून, गळा चिरुन हत्या झाल्याच्या घटनेने राज्याला मोठा धक्का बसला आहे. भाजप सरकार भ्रष्ट अधिकाऱ्यांचा बचाव करण्यात आणि विरोधीपक्ष नेत्यांविरुद्ध खोटे खटले दाखल करण्यात व्यस्त आहे. जाहिरातींवर लक्ष देण्याऐवजी उत्तर प्रदेशातील गुन्हेगारी कमी करण्यावर सरकारने लक्ष केंद्रीत केले पाहिजे” असे अखिलेश यांनी ट्विटरवर लिहिले आहे.

संबंधित बातम्या :

सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीच्या हत्येचं गूढ उकललं, काच खाली न केल्याच्या रागातून हत्याकांड

एमडीचे शिक्षण घेणाऱ्या डॉक्टर तरुणीची निर्घृण हत्या, आरोपी डॉक्टर ताब्यात

(Agra Dentist Dr Nisha Singhal Murder at home by man who entered on pretext of Set top box recharge)

ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान
ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान.
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?.
ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट
ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट.
असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज
असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज.
अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन
अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन.
भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही
भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही.
शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्...
शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्....
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?.
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय.
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब.