Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राकेश पाटील हत्या प्रकरण; बाळा नांदगावकरांनी घेतली राकेश यांच्या कुटुंबीयांची भेट; राज ठाकरेंकडूनही कुटुंबीयांचे फोनवरुन सांत्वन

अंबरनाथचे दिवंगत मनसे उपशहर अध्यक्ष राकेश पाटील यांच्या कुटुंबीयांची मनसे नेते बाळा नांदगावकर आणि मनसे आमदार राजू पाटील यांनी आज (30 ऑक्टोबर) भेट घेतली. राकेश पाटील यांची बुधवारी अंबरनाथ येथे धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती.

राकेश पाटील हत्या प्रकरण; बाळा नांदगावकरांनी घेतली राकेश यांच्या कुटुंबीयांची भेट; राज ठाकरेंकडूनही कुटुंबीयांचे फोनवरुन सांत्वन
Follow us
| Updated on: Oct 30, 2020 | 9:07 PM

ठाणे : अंबरनाथचे दिवंगत मनसे उपशहर अध्यक्ष राकेश पाटील यांच्या कुटुंबीयांची मनसे नेते बाळा नांदगावकर आणि मनसे आमदार राजू पाटील यांनी आज भेट घेतली. यावेळी पाटील यांच्या मारेकऱ्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी बाळा नांदगावकर यांनी केली. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीसुद्धा राकेश यांच्या कुटुंबीयांशी फोनवरून संवाद साधत त्यांना धीर दिला. तसेच कुटुंबीयांचे सांत्वन केले. (Bala Nandgaonkar visits Rakesh PatilS family Raj Thackeray also offers condolences to his family over phone)

मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह राजू पाटील यांनी आज दुपारी अंबरनाथ गावातील राकेश पाटील यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा फोनवरून पाटील कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. राकेश पाटील यांच्या हत्येमागे नेमकं काय कारण होतं?, हे शोधून काढण्यासोबतच आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचं या वेळी बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.

ज्यांच्या हाती सत्ता, त्यांचीच ही मस्ती

या हल्ल्यातील मुख्य आरोपी डी. मोहन याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून फक्त याच हत्येच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने नव्हे, तर त्याचा पूर्वेतिहास पाहता त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्याची मागणी नांदगावकर यांनी केली. तसेच ज्यांच्या हाती सत्ता आहे; त्यांचीच ही मस्ती सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

आम्हाला संघर्षाची सवय असून वाघ म्हटलं तरी खाणार आणि वाघ्या म्हटलं तरी खाणार, अशी गत असल्याने आधी वाट पाहू आणि मग काय ते बघून घेऊ, असा इशाराही नांदगावकर यांनी यावेळी दिला. यावेळी राकेश पाटील यांच्या कुटुंबीयांची भेट घेताना मनसेचे इतर कार्यकर्तेदेखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नेमकं प्रकरण काय ?

अंबरनाथ शहरात बुधवारी मनसेचे शहर उपाध्यक्ष राकेश पाटील (MNS Rakesh Patil) यांची भर रस्त्यात धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली. अंबरनाथमधील रिलायन्स रेसिडेन्सी परिसरात हा प्रकार घडला. संध्याकाळी साधारण साडेसहा ते सातच्या सुमारास राकेश पाटील येथील आर मार्टजवळ उभे होते. त्यावेळी अज्ञात व्यक्तींनी राकेश पाटील यांच्यावर हल्ला केला. (Attack on MNS ledar in Ambernath)

हल्लेखोरांनी राकेश पाटील यांना खाली पाडत त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्रांनी वार केले. यामध्ये पोटात आणि मानेवर घाव बसल्याने राकेश गंभीर जखमी झाले. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने आधी उल्हासनगरच्या एका खासगी रुग्णालयात नेले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना कल्याणच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. याठिकाणी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

संबंधित बातम्या : 

शिवसेना माजी शहरप्रमुख राहुल शेट्टी यांची हत्या; 24 तासात दोन हत्येच्या घटनांनी लोणावळा हादरलं

भर दिवसा सेवानिवृत्त शिक्षकाची हत्या, गुन्हा करून आरोपी स्वत: पोलीस स्टशनमध्ये हजर

क्षुल्लक कारणावरुन सासूची गळा आवळून हत्या, गोंदियातील धक्कादायक घटना

(Bala Nandgaonkar visits Rakesh PatilS family Raj Thackeray also offers condolences to his family over phone)

करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल.
रायगडावरील त्या समाधीसंदर्भात एक सवाल अन् उदयनराजे भडकले, कोण वाघ्या?
रायगडावरील त्या समाधीसंदर्भात एक सवाल अन् उदयनराजे भडकले, कोण वाघ्या?.
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, 31 तारखेला मुंबईत थर्ड डिग्री?
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, 31 तारखेला मुंबईत थर्ड डिग्री?.
वडिलांचं अफेअर अन्.., दिशाच्या मृत्यूचं कारण समोर; क्लोजर रिपोर्ट काय?
वडिलांचं अफेअर अन्.., दिशाच्या मृत्यूचं कारण समोर; क्लोजर रिपोर्ट काय?.
देशमुख हत्या प्रकरणात नव्या कराडची एन्ट्री, कोण आहे सुग्रीव कराड?
देशमुख हत्या प्रकरणात नव्या कराडची एन्ट्री, कोण आहे सुग्रीव कराड?.