Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशकात चोरांचा सुळसुळाट, दिवाळीच्या तोंडावर चेन स्नॅचिंग, बॅग लिफ्टिंगच्या घटनांत वाढ

शहरात ऐन दिवाळीच्या तोंडावर चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. चेन स्नॅचिंग, बॅग लिफ्टिंग, घरफोडीसारख्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या सराफा बाजारात चोरांचा उपद्रव वाढला आहे.

नाशकात चोरांचा सुळसुळाट, दिवाळीच्या तोंडावर चेन स्नॅचिंग, बॅग लिफ्टिंगच्या घटनांत वाढ
Follow us
| Updated on: Nov 04, 2020 | 4:13 PM

नाशिक : शहरात ऐन दिवाळीच्या तोंडावर चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. चेन स्नॅचिंग, बॅग लिफ्टिंग, घरफोडीसारख्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या सराफा बाजारात चोरांचा उपद्रव वाढला आहे. दोना दिवसांपूर्वीच 20 लाख रुपयांची बॅग पळवल्याची घटना समोर आल्यानंतर चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (chain snatching bag lifting incidents increase in Nashik)

सराफा बाजार हा शहरातील मुख्य बाजारपेठ असलेला भाग आहे. सोने, चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी नागरिकांची येथे नेहमीच वर्दळ असते. मात्र, मागील काही दिवसांपासून सराफा बाजारात बॅग लिफ्टिंग, चोरी, चेन स्नॅचिंगच्या घडना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. घरफोडीच्या प्रकारातही लक्षणीय वाढ झाली आहे. याबाबत विचारले असता “आमच्याकडे असलेल्या आकडेवारीनुसार चोरीच्या गुन्ह्यामध्ये 60 टक्क्यांनी घट झाली आहे. चेन स्रॅचिंगचे जे प्रकार आहेत त्यामधील जास्तीत जास्त आरोपींना आम्ही पकडले आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आम्ही सराफा व्यापाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. व्यापाऱ्यांनी काय खबरदारी घ्यायला हवी यावर आम्ही चर्चा केली आहे,” असे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संग्रामसिंग निशनदार यांनी सांगितलं आहे.

दरम्यान दोन दिवसांपूर्वी 20 लाख रुपयांची बॅग घेऊन चोरटे पसार झाले होते. हा चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मात्र, अजूनही चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिक चांगलेच धास्तावले आहेत. त्याचा अनिष्ट परिणाम बाजारपेठेवरही झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे सराफा व्यापारी तसेच इतर किरकोळ व्यापाऱ्यांकडून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.

संंबंधित बातम्या : Nashik | शरद पवारांच्या नाशिक दौऱ्यामुळे मराठा मोर्चाच्या नेत्यांची पोलिसांकडून धरपकड

नाशिकचे डॅशिंग ट्रॅफिक एसीपी मंगलसिंग सूर्यवंशी सेवानिवृत्त, वायरलेसवरुन निरोप घेताना भावूक

Nashik Corona Update | नाशिक जिल्ह्यात काल एकही कोरोनाबळी नाही, जिल्ह्याचा मृत्यू दर सध्या 1.78%

(chain snatching bag lifting incidents increase in Nashik)

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.