AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवी मुंबईत कोरोना संसर्ग पसरवल्याचा ठपका, दहा फिलीपाईन्स नागरिकांवर गुन्हा

कोरोना विषाणूंचा संसर्ग पसरवल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी 10 फिलिपाईन्स नागरिकांवर गुन्हा (Filipino People in Vashi Spread Corona) दाखल केला आहे.

नवी मुंबईत कोरोना संसर्ग पसरवल्याचा ठपका, दहा फिलीपाईन्स नागरिकांवर गुन्हा
| Updated on: Apr 05, 2020 | 2:20 PM
Share

नवी मुंबई : कोरोना विषाणूंचा संसर्ग पसरवल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी 10 फिलिपाईन्स नागरिकांवर गुन्हा (Filipino People in Vashi Spread Corona) दाखल केला आहे. महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना 2020 मधील आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नवी मुंबईतील वाशी सेक्टर 9 नुरुल इस्लाम ट्रस्टच्या प्लॉट क्रमांक 61 नुर-ए-मस्जिद या (Filipino People in Vashi Spread Corona)  ठिकाणी फिलिपाईन्समधून 10 नागरिक अनधिकृतपणे राहत होते. हे सर्व 10 मार्च 2020 ते 16 मार्च 2020 दरम्यान वाशीत राहिले होते.

यातील 6 जण इतर ठिकाणी राहायला गेले होते. तर 3 जण मात्र वाशीतील मशिदीतीच राहिले होते. या तिघांपैकी एका 68 वर्षीय आणि 42 वर्षीय फिलीपाईनच्या नागरिकास कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्यांनी ही माहिती प्रशासनापासून लपवून ठेवली. या दोघांमुळे वाशीत 13 जणांना आणि नेरूळमधील एका नागरिकांला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं आढळून आलं होतं.

मात्र या संसर्गजन्य गंभीर आजाराचा प्रादुर्भाव झालेला असतानाही त्यांनी कोणतीही माहिती न देता त्या ठिकाणी वास्तव्य केले. यामुळे त्यांच्यावर भारतीय दंड विधान कलम 188, 269, 270 विदेशी व्यक्ती अधिनियम 1946 कलम स14, साथीचे रोग अधिनियम 1897 कलम 3,4, महाराष्ट्र कोव्हीड 19 उपाययोजना 2020 कलम 11 नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला (Filipino People in Vashi Spread Corona)  आहे.

राज्यात कोरोना विषाणूंचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत (Corona patient in Maharashtra) आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृतांचीही संख्या वाढत आहे. नुकतंच राज्यात 26 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 635 वरुन 661 वर गेली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने याबाबतची माहिती दिली.

संबंधित बातम्या : 

Corona : कोरोनाच्या लढ्यात गणेश मंडळांचा मदतीचा हात, मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आर्थिक मदत

पुण्यात संपूर्ण पिरंगुट गावच क्वारंटाईन, पहिला कोरोना रुग्ण आढळल्याने खबरदारी

दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.