विरारमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तीन मुलींची सुखरुप सुटका

विरार पश्चिमेकडील ग्लोबल सिटी या हाय प्रोफाईल परिसरात राहत्या घरात वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या टोळीचा भांडाफोड करण्यात पोलिसांना यश आले आहे.

विरारमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तीन मुलींची सुखरुप सुटका
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 10:37 AM

मुंबई : विरार पश्चिमेकडील ग्लोबल सिटी या हाय प्रोफाईल परिसरात राहत्या घरात वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या टोळीचा भांडाफोड करण्यात पोलिसांना यश आले आहे. अनैतिकता मानवी वाहतूक शाखेच्या पथकाने काल रात्री 8 च्या सुमारास ही कारवाही केली आहे. (High profile sex racket exposed in Virar, safe release of three girls)

या कारवाईद्वारे 3 मुलींची सुटका करण्यात आली असून एक महिला आणि एका पुरुषाला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ग्लोबल सिटी या परिसरात उच्यभ्रू लोकांची वस्ती आहे. या परिसरात मुंबईसह आजूबाजूच्या परिसरातील लोक भाड्याने घर घेऊन राहतात.

ग्लोबल सिरीट परिसरातील एका भाड्याच्या घरात वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती नालासोपारा येथील अनैतिक मानवी वाहतूक शाखेला मिळाली होती. पोलिसांनी सुरुवातीला एक बोगस गिऱ्हाईक पाठवून मिळालेल्या माहितीची आणि तिथल्या परिस्थितीची खातरजमा केली असता भाड्याच्या घरात वेश्या व्यवसाय करण्यासाठी 3 मुली आणल्या असल्याचे निदर्शनास आले.

पक्की माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ संबंधित घरावर धाड टाकून 3 मुली, वेश्या व्यवसाय चालवणारा एक पुरुष आणि एक महिला अशा 5 जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी तिन्ही मुलींची सुटका केली. आरोपी महिला आणि पुरुषावर पिटा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईत सेक्स रॅकेट उद्ध्वस्त, बॉलिवूड अभिनेत्रीसह तिघांना अटक

मुंबई पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी मुंबईच्या गोरेगावमध्ये (Goregaon) एका पंचतारांकित हॉटेलमध्ये देह व्यापाराचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी एका बॉलिवूड अभिनेत्रीसह 3 मुलींना अटक केली असल्याची माहिती देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय दंड संहिता (IPC) कलम व्यापार (प्रतिबंध) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेच्या टीमने शुक्रवारी संध्याकाळी उशिरा पंचतारांकित हॉटेलमध्ये छापेमारी केली. यावेळी पोलीस ग्राहकांच्या वेशात गेले होते. जिथे त्यांना सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ते डिलर्सलासुद्धा भेटले. सगळ्या गोष्टींचा अंदाज आल्यानंतर पोलिसांनी छापेमारी केली. घटनास्थळावरून 3 महिलांची सुटका करण्यात आली आहे तर तिघांना अटक करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

जळगावातील उच्चभ्रू वस्तीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, चार बॉलिवूड अभिनेत्रींची सुटका

सेक्स रॅकेट चालवणाऱ्या बॉलिवूडच्या कास्टिंग डायरेक्टरला अटक, एका आठवड्यातील दुसरं प्रकरण

मुंबईत सेक्स रॅकेटचा धुमाकूळ, 4 दिवसात 4 सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

(High profile sex racket exposed in Virar, safe release of three girls)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.