इंदापुरात चोरट्यांचा एका रात्रीत सात दुकानांवर डल्ला, लाखाचा ऐवज लंपास, चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद

इंदापूर शहरात एकाच रात्रीत चोरट्यांनी सात दुकानांवर डल्ला मारलाय.

इंदापुरात चोरट्यांचा एका रात्रीत सात दुकानांवर डल्ला, लाखाचा ऐवज लंपास, चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद
Follow us
| Updated on: Nov 25, 2020 | 3:15 PM

इंदापूर : शहरात एकाच रात्रीत चोरट्यांनी सात दुकानांवर डल्ला मारलाय. चोरट्यांनी सात दुकाने फोडून जवळपास 1 लाखांहून अधिक रुपयांचा ऐवज लंपास केलाय. चोरीचा हा सारा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. (In Indapur, thieves robbed seven shops in one night)

एकाच रात्रीत 7 दुकाने फोडल्याने चोरट्यांच्या हैदोसाने दुकानदारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. शहरातील कपड्यांचं दुकान, कृषी सेवा केंद्र, मेडिकल, कॉम्प्युटरचं दुकान अशा दुकानांवर चोरट्यांनी डल्ला मारला.

इंदापूर टेंभुर्णी नाक्यावरती पार्वती गारमेंट्स अँड कंपनी या नावाचे दुकान बंद केल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास या दुकानाचे शटर उचकटून कुलूप तोडून गल्ल्यांमध्ये ठेवलेली वीस हजार रुपयांची रोख रक्कम आणि पाच हजार रुपयांचे कपडे चोरट्यांनी चोरून नेले. तसेच अतुल कृषी सेवा केंद्रातून कृषी औषधाचे 19 हजार रुपये किमतीचे पाच बॉक्स चोरून नेले.

महालक्ष्मी बाजार या दुकानातून  31 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. तर समर्थ मेडिकल या औषध दुकानातून चोरट्यांनी 9800 रुपयांचा रोख रक्कम चोरून नेली. त्यानंतर राऊत ॲग्रो सर्व्हिसेस या दुकानाचे शटर उचकटून या दुकानात प्रवेश केला व चोरी करण्याचा प्रयत्न केला. येथे चोरट्यांना चोरी करता आली नाही मात्र, या दुकानाच्या शेजारीच गणेश निमसे यांच्या विमा कंपनीच्या कार्यालयातही चोरट्यांनी प्रवेश करून चोरी करण्याचा प्रयत्न केला. त्या शेजारील ब्लू चिप कॉम्प्युटर या दुकानात प्रवेश करून दुकानातील तिजोरीतील 2275 रुपये रोख चोरून नेले.

“याबाबत इंदापूर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्यामुळे लवकरच यातील आरोपींना अटक करण्यात यश मिळेल”, असे इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी सांगितले.

(In Indapur, thieves robbed seven shops in one night)

संबंधित बातम्या

लिकर किंग अतुल मदन फरार घोषित, नाशिक पोलिसांच्या दोन पथकांकडून शोध सुरु

एकाच कुटुंबातील चौघांची हत्या, लुधियाना हादरलं

जमील शेखला ठार केलं, आता पुढचं टार्गेट मीच असेन : अविनाश जाधव

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.