Jalgaon Murder | मुक्ताईनगरमध्ये माजी सभापतींची गळा चिरुन हत्या

डी. ओ. पाटील हे मुक्ताईनगर पंचायत समितीचे माजी सभापती होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. (Jalgaon Muktainagar Panchayat Samiti Ex Chairman D O Patil Murder)

Jalgaon Murder | मुक्ताईनगरमध्ये माजी सभापतींची गळा चिरुन हत्या
Follow us
| Updated on: Jun 17, 2020 | 11:37 AM

जळगाव : मुक्ताईनगर पंचायत समितीचे माजी सभापती डी. ओ. पाटील यांच्या हत्येने एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी रात्री पेट्रोलपंप परिसरात पाटील यांची गळा चिरुन निर्घृण हत्या करण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या वेळी ते राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आले होते. (Jalgaon Muktainagar Panchayat Samiti Ex Chairman D O Patil Murder)

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरात कुऱ्हा काकोडा भागात ही घटना घडली. बुधवारी सकाळी हत्येचा प्रकार उघडकीस आल्यानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता. तूर्तास तणाव निवळला असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

हेही वाचा : ‘वारणा कामगार सोसायटी’च्या संचालकाची हत्या, देवपूजा करताना पत्नीकडून डोक्यात हातोडा

डी. ओ. पाटील हे राजकीय क्षेत्रातील अतिशय मनमिळावू व्यक्तिमत्व होते. मुक्ताईनगर पंचायत समितीचे ते माजी सभापती होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.

मुक्ताईनगरमध्ये भाजप नेते एकनाथ खडसे सलग सहा वेळा आमदारपदी निवडून आले होते. यंदा मात्र खडसेंच्या कन्येला पराभूत करुन अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील विजयी झाले. ते सध्या शिवसेनेत आहेत.

नेमकं काय झालं?

कुऱ्हा येथील गोसावी पेट्रोल पंप परिसरामध्ये ही हत्या झाली. डी. ओ. पाटील अनेकदा शेतीच्या कामानिमित्त रात्री-अपरात्री डिझेल भरण्यासाठी जात असत. काहीवेळा ते पेट्रोल पंपावरच रात्री झोपत असत. याची माहिती असलेल्या व्यक्तीने नियोजनबद्ध हत्या केली असावी, असा अंदाज बांधला जात आहे. (Jalgaon Muktainagar Panchayat Samiti Ex Chairman D O Patil Murder)

मंगळवारी रात्री किती वाजता हा प्रकार घडला हे अद्याप समजलेले नाही. हत्येचे कारण अस्पष्ट असून घटनास्थळाला पोलिसांनी सील केले आहे. डी. ओ. पाटील यांच्या हत्येप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मुक्ताईनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.

पाहा व्हिडिओ :

(Jalgaon Muktainagar Panchayat Samiti Ex Chairman D O Patil Murder)

'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.