उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमधून चांदीची बंदूक चोरीला, चोरटा गजाआड

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेसमधून शोभेची चांदीची बंदूक चोरीला

उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमधून चांदीची बंदूक चोरीला, चोरटा गजाआड
Follow us
| Updated on: Nov 10, 2020 | 8:48 AM

सातारा : खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेसमधून शोभेची चांदीची बंदूक चोरीला (MP Udayanraje Bhonsale Silver Pistol) गेली होती. पॅलेसमधील कामगारानेच ही बंदूक चोरी केल्याचं आता उघड झालं आहे. याप्रकरणी संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे (MP Udayanraje Bhonsale Silver Pistol).

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस येथून सोमवारी (10 नोव्हेंबर) एका कामगाराने शोभेच्या चांदीच्या बंदुकीची चोरी केली होती. ती बंदूक साताऱ्यातील एका सोने-चांदीच्या व्यवसायिकाकडे तो विक्रीसाठी घेवून जात असल्याची माहिती सातारा शहर शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल संजू गुसिंगे यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी कारवाई करत या कामगाराला ताब्यात घेतलं.

त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे दोन फूट लांब, अंदाजे दीड किलो वजन असलेली चांदीची बंदूक आढळून आली. संशयित व्यक्तीकडे अधिक चौकशी केली असता त्याने ही बंदूक उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेस येथून चोरल्याची कबूली पोलिसांना दिली.

या चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जलमंदिर पॅलेस याठिकाणी माळी कामासाठी आलेल्या कामगाराने ही चोरी केल्याची बाब समोर आली. या बंदुकीची अंदाजे किंमत सुमारे 1 लाख रुपये असल्याची माहिती आहे.

MP Udayanraje Bhonsale Silver Pistol

संबंधित बातम्या :

कधीही हाक मारा त्यात कुठेही कमी पडणार नाही; अलकाताईंची बाजू घेत उदयनराजेंचा प्राजक्ताला इशारा

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.