AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोबाईल शोरुम फोडणारी टोळी गजाआड, नवी मुंबई पोलिसांकडून तिघांना अटक, 45 लाखांचा मुद्देमाल जप्त

खारघरमधील शिव इलेक्ट्रॉनिक्स या मोबाईल शोरुमचे शटर गॅस कटरने कट करुन सुमारे 50 लाख रुपये किमतीच्या वस्तूंची चोरी करण्यात आली होती.

मोबाईल शोरुम फोडणारी टोळी गजाआड, नवी मुंबई पोलिसांकडून तिघांना अटक, 45 लाखांचा मुद्देमाल जप्त
| Updated on: Sep 08, 2020 | 6:47 PM
Share

नवी मुंबई : खारघरमधील शिव इलेक्ट्रॉनिक्स या मोबाईल शोरुमचे (Navi Mumbai Mobile Shop Robbery) शटर गॅस कटरने कट करुन सुमारे 50 लाख रुपये किमतीच्या वस्तूंची चोरी करण्यात आली होती. या प्रकरणी नवी मुंबई गुन्हे शाखेने तीन आरोपींसह पोलिसांनी 45 लाख रुपयांचा चोरी केलेला ऐवज हस्तगत केला आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह यांनी आयुक्तालयात पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली (Navi Mumbai Mobile Shop Robbery).

खारघर येथील शिव इलेक्ट्रॉनिक्स या मोबाईल शोरुमचे शटर गॅस कटरने कट करुन सुमारे 50 लाख किमतीच्या वस्तूंची चोरी करण्यात आली होती. यामध्ये महागडे मोबाईल, लॅपटॉप, रोख रकमेचा समावेश होता. गुन्हेगारांनी अतिशय नियोजनरीत्या गुन्हा करत ओळख पटू नये यासाठी शोरुममधील डी.व्ही.आर काढून टाकला होता. त्यानंतर संबंधित मोबाईलचे शोरुम फोडून लाखो रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी करुन नेले.

या गुन्ह्याचा समांतर तपास चालू असताना गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. बी. कोल्हटकर यांना या गुन्ह्यातील आरोपींबाबत खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार, मध्यवर्ती कक्षाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांनी धारावीतून शफिकउल्ला उर्फ सोनु अतिकउल्ला ( वय 24 वर्षे), अयान उर्फ निसार उर्फ बिटु रफी अहमद शेख (वय 28 वर्षे) आणि नालासोपारा येथून इम्रान मोहमद उर्फ इम्मु बिंदु अन्सारी (वय 25 वर्षे) या तिघांना ताब्यात घेतले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांना सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Navi Mumbai Mobile Shop Robbery

संबंधित बातम्या :

बुलडाण्यात दहा रुपयांच्या उधारीसाठी दारु विक्रेत्याने एकाला पेट्रोल टाकून जिवंत पेटवलं, गुन्हा दाखल

मुंबईत वृद्धेची धारदार शस्त्राने हत्या, 19 तोळे सोने लंपास, पुतण्या ताब्यात

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.