पोटच्या मुलीला वेश्या व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न, एक लाखात सौदा करणारी नवी मुंबईची महिला गजाआड

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने नवी मुंबईत आपल्या पोटच्या मुलीचा एक लाख रुपयांना व्यवहार करणाऱ्या महिलेला अटक केली आहे (Police action against prostitution).

पोटच्या मुलीला वेश्या व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न, एक लाखात सौदा करणारी नवी मुंबईची महिला गजाआड
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 12:43 PM

नवी मुंबई :  आपल्या पोटच्या मुलीचा एक लाख रुपयांना व्यवहार करणाऱ्या महिलेला अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने नवी मुंबईत अटक केली आहे (Police action against prostitution). मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नवी मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली. संबंधित मुलीला सुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. पोलीस आयुक्त संजयकुमार यांनी नुकतेच नवी मुंबईत आढळणाऱ्या बेकायदेशीर अवैध कृत्यांना आळा घालण्याबाबत गुन्हे शाखेस आदेश दिले होते. यानंतर ही कारवाई करण्यात आली.

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन गरड यांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार मीरा-भाईंदर येथे राहणाऱ्या एका महिलेस सुमारे अठरा वर्षे वयाची तरुण मुलगी आहे. स्वतःच्या मुलीचा यापूर्वी कोणत्याही पुरुषाबरोबर शरीर संबंध झालेला नसल्याचं सांगत ही महिला तिच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेण्याचा प्रयत्न करत होती. यासाठी ती ग्राहकाच्या शोधात असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली.

हेही वाचा : दिल्लीत शरीरविक्री करणाऱ्या महिलांना नवी दिशा, कोरोना मास्क निर्मितीचे काम हाती

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन गरड यांना खबरी मार्फत मिळालेल्या माहितीनंतर बनावट ग्राहकामार्फत आरोपी महिलेसोबत बोलणं करण्यात आलं. तिने या बनावट ग्राहकाकडे यासाठी दीड लाख रुपयांची मागणी केली. अखेर बोलणे झाल्यानंतर आरोपीने हा सौदा एक लाख वीस हजार रुपयांमध्ये ठरवला. पोलिसाच्या बनावट ग्राहकाने शिरवणे गाव (नेरुळ) येथील हॉटेल कोहिनूर पॅलेस येथे आरोपी महिलेच्या सांगण्यावरुन 1 रुम बुक केली.

सायंकाळी पाचच्या सुमारास ही महिला मीरा-भाईंदर येथून इंडिका कारने आपल्या मुलीसह हॉटेलमध्ये आली. या ठिकाणी आरोपी महिलेबरोबर बनावट ग्राहकाने बोलणं केलं. तसेच आईच्या सांगण्याप्रमाणे मुलीस घेऊन रुममध्ये गेला. रुममध्ये ही मुलगी वेश्यागमनासाठी अर्धनग्न होत होती. त्यावेळी बनावट ग्राहकाने पोलिसांना मोबाईलवरुन ठरल्याप्रमाणे इशारा केला. यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन गरड आणि त्यांच्या पथकाने पंचासह छापा टाकला.

हेही वाचा : वेश्या महिलांच्या मुलींचे देश-विदेशात कौतुक, लालबत्ती नाटकातून वास्तव मांडण्याचा प्रयत्न

या कारवाईमध्ये पीडित मुलीची आई पोलिसांच्या सापळ्यात सापडली. याबाबत नेरुळ पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. मुलीची आई सोनम हाकीम सिंग (वय 40 वर्षे, मिरा रोड पूर्व) हिला अटक करण्यात आली आहे. तसेच पीडित मुलीला सुधारगृहामध्ये पाठवण्यात आलं आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त, प्रवीणकुमार पाटील, सहायक पोलीस आयुक्त विनोद चव्हाण (गुन्हे शाखा) आणि सहायक पोलीस आयुक्त अजय कदम (गुन्हे शाखा, नवी मुंबई) यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाई पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन गरड, सहायक पोलीस निरीक्षक सुनिता भोर, पोलीस हवालदार वायकर, कोकरे, कारखेले, पोलीस नाईक पाटील, पवार, धनगर यांचा समावेश होता.

हेही वाचा :

नोकरीसाठी बहिण शहरात पाठवली, भावाला वेश्यालयात सापडली

बुलडाण्यात वेश्याव्यवसाय करणाऱ्या गेस्ट हाऊसवर पोलिसांची धाड

जावयासोबत लिव्ह इनमध्ये, वादावादीतून सासूची हत्या

Police action against prostitution

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.