धारावीतून 2 कोटींचे ड्रग्ज जप्त, NCBची धडाकेबाज कारवाई
एनसीबीने ड्रग्जविरोधात मोठी कारवाई करत 2 कोटी 40 लाख रुपये किंमत असणारे 1 किलो 200 ग्रॅम ड्रग्ज जप्त केलेलं आहे.
मुंबई : मुंबईमध्ये काही दिवसांपासून ड्रग्ज माफियांविरोधात धडाकेबाज कारवाई सुरु आहे (NCB Disposed Drug Dealers). मात्र, आता मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ड्रग्जविरोधात मोठी कारवाई करत आंतरराष्ट्रीय बाजारात 2 कोटी 40 लाख रुपये किंमत असणारे 1 किलो 200 ग्रॅम ड्रग्ज जप्त केलेलं आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाच्या घाटकोपर युनिटने ही मोठी कारवाई केली असून ड्रग्ज तस्करी करणाऱ्या आरोपीला तुरुंगात पाठवण्यात आलं (NCB Disposed Drug Dealers).
अंमली पदार्थ विरोधी पथक घाटकोपरच्या युनिटला 14 तारखेला मिळालेल्या माहितीनुसार धारावी परिसरातल्या 90 फिट रोड परिसरात ड्रग्जची तस्करी करण्यासाठी एक इसम येणार असल्याचे कळलं होतं. त्यानुसार, घाटकोपर अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या युनिटने सापळा रचला आणि संशयित इसमाला बेड्या ठोकल्या. त्याची झाडाझडती घेतल्यावर त्याच्याकडून हेरॉईन ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला. ज्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तब्बल 2 कोटी 40 लाख रुपये आहे.
मुंबईत ड्रग्जविरोधात होणाऱ्या कारवाया पाहता आरोपीकडून जप्त करण्यात येणार ड्रग्ज मुंबईत नक्की कोणत्या मार्गाने येत हा प्रश्न नेहमी निर्माण होतो. हेरॉईन, कोकेन, मेफीड्रिन, यांसारख्या असंख्य प्रकारच्या ड्रग्जची मुंबईत तस्करी केली जाते. या ड्रग्जची मागणी करणाऱ्यांची संख्याही तितकीच मोठी आहे. काही दिवसांपूर्वीच सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात एनसीबीने ड्रग्ज अँगलने तपास केला. यामध्ये अनेक हायप्रोफाईल व्यक्तीसुद्धा ड्रग्जच सेवन करत असल्याची माहिती समोर आली. मुंबई ड्रग्ज तस्करीचे हब बनत चालली आहे.
घाटकोपर येथील अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केलेल्या या आरोपीचे नाव मनझार दिन मोहमद शेख (वय 47) असं आहे. यापूर्वीसुद्धा 2018 साली त्याच्यावर घाटकोपर युनिटनेच ड्रग्जविरोधात कारवाई केली होती. आरोपी शेख हा मुंबई आणि उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जची विक्री करत असल्याचं समोर आलं. हेरॉईन ड्रग्ज महाग असल्यामुळे हे ड्रग्ज विकत घेणारे नक्की कोण आहेत याचाही शोध पोलीस घेणार आहेत.
पनवेलमध्ये खवल्या मांजरांची तस्करी, पाच जणांना अटक, वनविभागाची यशस्वी कारवाईhttps://t.co/0Ns3WxyCHm#CrimeNews #PangolinSmuggling
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 14, 2020
NCB Disposed Drug Dealers
संबंधित बातम्या :
वांद्रे, पाली हिल, जुहू, खार, अंधेरीत ड्रग्जच्या रॅकेटचा पर्दाफाश, NCBची मोठी कारवाई
पुण्यातील सराफाची दुकाने फोडणारी टोळी गजाआड; एक कोटी 11 लाखांचा मुद्देमाल जप्त