Arnab Goswami| अर्णव गोस्वामींना आजही हायकोर्टाकडून दिलासा नाही; आता सुनावणी उद्या होणार
पत्रकार अर्णव गोस्वामी यांना आजही न्यायालयात दिलासा मिळाला नाही. त्यांच्या जामीन अर्जावर आता उद्या सुनावणी होणार असून उद्या जामीन मिळणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई: पत्रकार अर्णव गोस्वामी यांना आजही उच्च न्यायालयात दिलासा मिळाला नाही. त्यांच्या जामीन अर्जावर आता उद्या सुनावणी होणार असून उद्या जामीन मिळणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (No interim relief to Arnab Goswami in Bombay HC)
अर्णव गोस्वामी यांनी अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी जामीन मिळावा आणि एफआयआर रद्द करावा म्हणून याचिका दाखल केली होती. त्यावरील युक्तिवाद पूर्ण न झाल्याने ही सुनावणी उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. तर, अलिबाग पोलिसांनीही अलिबाग सत्र न्यायालयात याचिका दाखल करून अर्णव यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली आहे. त्यावरही उद्या सकाळी 11 वाजता सुनावणी होणार आहे. त्यामुळे उद्या मुंबई उच्च न्यायालय आणि अलिबाग सत्र न्यायालयात काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अर्णव यांच्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार असल्याने त्यांना पुन्हा एकदा अलिबागमधील नगरपालिकेच्या शाळेत जावं लागणार आहे. अर्णव गोस्वामी यांच्यासह फिरोज शेख, नितेश सरडा या तिन्ही संशयित आरोपींची रवानगी अलिबागमधील नगरपालिकेच्या शाळेत करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही आरोपींना थेट जेलमध्ये न नेता क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवलं जातं. त्यामुळे या तिघांना नगरपालिकेच्या शाळेत ठेवण्यात आले आहे.
इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना काल (4 नोव्हेंबर) अटक करण्यात आली. यानंतर अलिबाग न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही आरोपींना जेलमध्ये न नेता 14 दिवस क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जाते. या नियमानुसार, अर्णव गोस्वामी, फिरोज शेख, नितेश सरडा या तिन्ही संशयित आरोपींना अलिबागमधील नगरपालिकेच्या शाळेत ठेवलं जाणार आहे. अलिबागमधील ही शाळा आरोपींसाठी क्वारंटाईन सेंटर म्हणून करण्यात आली आहे. यातच त्यांनी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांची जेलमध्ये रवानगी केली जाणार आहे. (No interim relief to Arnab Goswami in Bombay HC)
#PROMO | अर्णव, कोर्ट, सरकार आणि रात्र? पाहा स्पेशल रिपोर्ट आज रात्री 9.58 वाजता @TV9Marathi वर @umeshk73 @NikhilaMhatre @KadamGtk @Manikmundhe pic.twitter.com/N4Wt0GanoI
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 6, 2020
संबंधित बातम्या:
अर्णव गोस्वामींना हायकोर्टाकडून तूर्तास दिलासा नाहीच, आजची रात्र शाळेत, उद्या पुन्हा सुनावणी
Arnab Goswami | अर्णव गोस्वामी प्रकरण : न्यायालयात नेमकं काय घडलं?
Arnab Goswami| हरिश साळवे म्हणाले, अर्णवला जामीन दिल्यास आभाळ कोसळेल का? कोर्टात काय काय घडलं?
(No interim relief to Arnab Goswami in Bombay HC)