AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

झाडावरुन पैसे पाडण्याच्या आमिषाने लोकांची फसवणूक; पोलिसांनी जादुटोणा करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या

खानवेल येथील विश्वकर्मा या व्यक्तीची पालघर मधील आरोपींनी पैसे दुप्पट करून देतो म्हणून जंगलात नेऊन फसवणूक केली होती. | Palghar fraud

झाडावरुन पैसे पाडण्याच्या आमिषाने लोकांची फसवणूक; पोलिसांनी जादुटोणा करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या
| Updated on: Nov 04, 2020 | 12:08 AM
Share

पालघर: जादुटोण्याच्या साहाय्याने झाडावरुन पैसे पाडून देण्याच्या आमिषाने लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळक्याला पालघर पोलिसांनी मंगळवारी बेड्या ठोकल्या. या टोळक्याने गुजरातमधील एका व्यक्तीची फसवणूक करुन त्याचे अपहरण केले होते. यानंतर त्याच्या कुटुंबीयांकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या तिन्ही गुन्ह्यांप्रकरणी पालघर पोलिसांनी आज पाच आरोपींनी अटक केली. (Police arrested gang in Blackmagic and Fraud case in Palghar)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खानवेल येथील विश्वकर्मा या व्यक्तीची पालघर मधील आरोपींनी पैसे दुप्पट करून देतो म्हणून जंगलात नेऊन फसवणूक केली होती. त्यानंतर आरोपींमध्ये घडलेल्या नाट्यमय प्रकारानंतर आरोपींकडून एकमेकांच्या कुटुंबीयांचे अपहरण करण्यात आले. यानंतर परस्परांकडून खंडणी मागण्यात आली. फसवणूक अपहरण आणि खंडणी अशा तीन वेगवेगळ्या गुन्ह्यात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

या टोळीचे परराज्यातही हितसंबंध असल्याचे माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पालघर पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून आतापर्यंत एक तलवार पोलिसांनी हस्तगत केली आहे. तर अपहरण होत असताना असलेल्या व्यक्तीला वाचवण्यात पोलिसांना यश आल्यानंतर हा प्रकार उघड झाला . जादुटोणा करून पैसे दुप्पट करून देतो अशी कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी समोर येऊन तक्रार दाखल करावी. तसेच अंधश्रद्धांवर कोणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन पालघरचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी नागरिकांना केले.

इतर बातम्या:

पालघरमध्ये हॉटेलबाहेर बाळाच्या अपहरणाचा प्रयत्न, भाजी विक्रेत्यामुळे महिलेला बेड्या

आधी हॉटेलवर पाळत, मग दरोडा, पालघरमध्ये बंदुकीच्या जोरावर 1 लाख रुपयांपेक्षा अधिकची लूट

पालघर साधू हत्याकांड : एका अधिकाऱ्यासह 18 पोलिसांवर कारवाई; राज्य सरकारची सुप्रीम कोर्टात माहिती

(Police arrested gang in Blackmagic and Fraud case in Palghar)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.