पदभार स्वीकारताच पनवेलच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा धडाका, आठ वर्ष जुन्या हत्याकांडातील आरोपी गजाआड
तुर्भे येथे 55 वर्षीय आनंदा बाबुराव सुकाळे यांची 29 डिसेंबर 2012 रोजी हत्या झाली होती.
नवी मुंबई : वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारताच गिरीधर गोरे (Giridhar Gore) यांनी कामाचा धडाका लावला आहे. चार्ज हाती घेतल्यानंतर अवघ्या काही तासातच 8 वर्षांपूर्वी घडलेल्या माथाडी कामगार हत्या प्रकरणातील सराईत गुन्हेगाराला गोरेंनी गजाआड केले. गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलचे (Panvel) वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून गिरीधर गोरे यांनी पदभार स्वीकारला. (Panvel Senior PI Giridhar Gore arrests Criminal in 8 years old murder case after taking charge)
55 वर्षीय आनंदा बाबुराव सुकाळे यांची 29 डिसेंबर 2012 रोजी हत्या झाली होती. एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नियोजित तुर्भे एसटी डेपोच्या गेटवर सेक्टर 20 तुर्भे येथे हा प्रकार घडला होता. डोक्यात जड वस्तूने वार करुन नायलॉनच्या गोणीने गळा आवळून सुकाळेंना जीवे मारण्यात आले होते. याबाबत एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.
सुरक्षारक्षकांना विश्वासात घेऊन माहिती घेतली असता एका सुरक्षारक्षकाने हा सर्व प्रकार बघितल्याचे समोर आले. त्याबाबत माहिती देताना सराईत आरोपी दशरथ विठ्ठल कांबळे याचे नाव सुरक्षारक्षकाने सांगितले. आरोपीला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
जुगारामध्ये आनंदा सुकाळे यांनी 25 हजार रुपये जिंकले होते. ते पैसे जबरीने चोरी करण्यासाठी त्याने ही हत्या केली होती. त्याच्यावर यापूर्वीही जबरी चोरी, चोरी, दरोडा असे गुन्हे असून यापूर्वी त्याला हद्दपार करण्यात आले होते. अखेरीस गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने 8 वर्षांपूर्वीच्या हत्या प्रकरणाला वाचा फोडली.
गुन्ह्याचा समांतर तपास पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. बी. जी. शेखर पाटील, गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त प्रवीण पाटील यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कराड, संदीप गायकवाड, शरद ढोले, स. फौ. पाटील, पोहवा साळुंखे, पाटील, गडगे, पवार, तरकासे, वाघ, सुर्यवंशी, पो. ना. कुदळे, म्हात्रे, पाटील, कानू, मोरे, पो. शि. भोपी आदींचे पथक करत होते.
विवाहित महिलेची गळा आवळून हत्या करत मृतदेह विहिरीत फेकला, प्रियकराला 24 तासात अटकhttps://t.co/GGYGgqBzoH#KolhapurCrime #CrimeNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 6, 2020
संबंधित बातम्या :
रेल्वे ट्रॅकवरुन चालताना लूट, तरुणाला आठ वर्षांनी दागिने परत मिळाले
पत्नीवर वाईट नजर, अश्लील संवाद, वर्ध्यात पतीकडून मित्राची दगडाने ठेचून हत्या
(Panvel Senior PI Giridhar Gore arrests Criminal in 8 years old murder case after taking charge)