AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाईचा बड्डे पडला महागात ! बारा मित्रांचे पोलिसांनी वाजवले बारा

रविवारी (27 ऑक्टोबर) शहरातील शनिमंदिर चौकात रस्त्यावर गाडी लावून केक कापल्याने पोलिसांनी 12 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

भाईचा बड्डे पडला महागात ! बारा मित्रांचे पोलिसांनी वाजवले बारा
| Updated on: Oct 27, 2020 | 10:36 PM
Share

जालना : वाढदिवस म्हटलं की रस्त्यावर गाडी लावून केक कापण्याचं नवं फॅड आजकाल तरुणांच्या डोक्यात शिरलं आहे. रात्री अपरात्री रस्त्यावर आपल्या भाईचा बड्डे साजरा करण्यात या तरुणांना मोठं थ्रील केल्यासारखं वाटतं. मात्र, जालना शहरात अशाच बारा ‘भाई वेड्यांचे’ पोलिसांनी बारा वाजवले आहेत. रस्त्यावर गाडी लावून केक कापल्याने पोलिसांनी त्यांना चांगलाच इंगा दाखवला आहे. पोलिसांनी रात्री अपरात्री जमून वाढदिवस साजरा करणाऱ्या या 12 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Police registered case against 12 people for cutting a cake on the road )

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (27 ऑक्टोबर) शहरातील शनिमंदिर चौकात काही लोक एकत्र जमून वाढदिवस साजरा करत होते. ही माहिती कदिम पोलीस ठाण्याला मिळाली. माहिती मिळताच रात्री पेट्रोलिंगसाठी तैनात असलेले पोलीस अधिकारी शनिमंदिर चौकात तातडीने पोहोचले. त्या ठिकाणी दहा ते बारा जण रस्त्यावर गाडी आडवी लावून केक कापत असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी त्या सर्वांना ताब्यात घेऊन 12 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, 12 जणांना मित्राचा बड्डे चांगलाच महागात पडला आहे. आजकाल मित्रमंडळी, नातेवाईकांचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्याचं फॅड आलं आहे. त्यात रात्री अपरात्री रस्त्यावर गाडी लावून केक कापणे, मित्राच्या अंगावर अंडी फोडणे असे प्रकार सर्रास केले जातात. त्यातून कधीकधी अनावश्यक वाद निर्माण झाल्याच्या घडनाही घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वाढदिवस हा निखळ आनंदाचा क्षण असतो. तो अवाजवी पद्धतीने साजरा न करता आनंदात आणि साधेपणानेच साजरा करावा. रात्री अपरात्री रस्त्यावर गाडी लाऊन केक कापू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या :

PHOTO | बबड्या-शुभ्राच्या लग्नाचा पहिला वाढदिवस, पाहा या खास सोहळ्याची क्षणचित्रे!

PHOTO | ‘मोहेंजो दारो’ अभिनेत्री पूजा हेगडेचा वाढदिवस, लवकरच ‘बाहुबली’सोबत चित्रपटात झळकणार!

Birthday Special: ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनींचा वाढदिवस; जाणून घ्या त्यांच्या फिटनेसचं रहस्य!

(Police registered case against 12 people for cutting a cake on the road )

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.