कल्याणचा इश्कबाज चोरटा; पाच गर्लफ्रेंड्सची हौस भागविण्यासाठी मोबाईल चोरी
निखील ठाकरे नावाच्या या चोरट्याच्या पाच गर्लफ्रेंड आहेत. त्या गर्लफ्रेंड्सची हौस भागविण्यासाठी हा लोकांचा मोबाईल चोरायचा
कल्याण : कल्याणमध्ये पोलिसांनी एका मोबाईल चोरट्ट्याला अटक केली आहे (Romeo Mobile Thief). या मोबाईल चोरट्याकडून दहा मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. एका साथीदाराच्या मदतीने हा चोरटा मोबाईल हिसकावून पळ काढायचा. विशेष म्हणजे निखील ठाकरे नावाच्या या चोरट्याच्या पाच गर्लफ्रेंड आहेत. त्या गर्लफ्रेंड्सची हौस भागविण्यासाठी हा लोकांचा मोबाईल चोरायचा (Romeo Mobile Thief).
कल्याण-डोंबिवली परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोबाईल चोरीच्या घटनेत वाढ झाली होती. अॅक्टिव्हा स्वार दोन चोरटे लोकांच्या हातातील मोबाईल हिसकावून पसार व्हायचे.
कल्याण पश्चिमेतील वालधूनी परिसरात एका तरुणाचा मोबाईल हिसकावून चोरट्यांनी पळ काढल्याची घटना सीसीटीइव्हीत कैद झाली होती. या सीसीटीव्हीच्या सहाय्याने कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी तपास सुरु केला. एसीपी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरिक्षक नारायण बनकर यांनी पोलीस पथक तयार केले.
या घटनेचा तपास पोलीस अधिकारी प्रकाश पाटील यांच्याकडे दिला गेला. अखेर पोलिसांना तपासात यश आले. भिवंडी येथील नांदेडकरमध्ये राहणारा मोबाईल चोरटा निखील ठाकरे याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून पोलिसांनी दहा मोबाईल हस्तगत केले. कल्याणमधील तीन घटना उघडकीस आल्या आहेत. अन्य मोबाईल याने कुठून चोरले आहे. याचा तपास सुरु आहे. तसेच, त्याच्या एका साथीदाराचा शोध सुरु आहे.
निखील याला पाच गर्लफ्रेंड आहेत. तो प्रत्येक गर्लफ्रेंडची हौस भागवतो. त्याच्याकडे खूप पैसा आहे. हे दाखविण्यासाठी निखीलने मोबाईल चोरीचा धंदा सुरु केला होता. पोलिसांनी त्याचा मुसक्या आवळल्या आहेत. या सबोतच महात्मा फुले पोलिसांनी दुसऱ्या प्रकरणातील दोन मोबाईल चोरटे अविनाश विठ्ठल आणि एका अल्पवयीन मुलाला अटक करुन त्याच्यांकडूनही मोबाईल हस्तगत केले आहेत.
भिकारी महिलेच्या झोपडीत 10 महागडे मोबाईल, पोलीसही अवाकhttps://t.co/7dR9zRi1v8#Beggar #VasaiVirar
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 24, 2020
Romeo Mobile Thief
संबंधित बातम्या :
वाहनातील ऑईल गळत असल्याचा बनाव, बँकेसमोरुनच 25 लाखांची रोकड लंपास
अमेरिकेच्या नागरिकांची फसवणूक, नालासोपाऱ्यातील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश, 10 जण ताब्यात
देशी दारुची तस्करी जोमात, भंडारा जिल्ह्यात 8 लाखांची दारु जप्त, सहा जणांना बेड्या