सांगलीत 52 लाखांचा गांजा जप्त, जत पोलिसांची मोठी कारवाई
बसाप्पा खुशाबा आक्कीवाट यांच्या हळदीच्या पिकात 520 किलोची गांजाची झाडे जत पोलिसांनी छापा टाकून जप्त केली.
सांगली : सांगलीत 52 लाखांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्यातील जत पोलिसांनी (Marijuana Seized In Sangli) ही मोठी कारवाई केली. याप्रकरणी एकाला अचक करण्यात आली असून त्याच्याकडून 520 किलो गांजाची झाडं जप्त करण्यात आली आहेत (Marijuana Seized In Sangli).
जिल्ह्यातील जत तालुक्यातील सिंदूर येथे बसाप्पा खुशाबा आक्कीवाट यांच्या हळदीच्या पिकात 520 किलोची गांजाची झाडे जत पोलिसांनी छापा टाकून जप्त केली. या गांजाची किंमत सुमारे 51 लाख 93 हजार 300 रुपये इतकी आहे.
सोमवारी (2 नोव्हेंबर) दुपारी ही कारवाई करण्यात आली असून संशयित आरोपी आक्कीवाट याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईची जत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
जतचे पोलीस निरीक्षक यांना गोपनीय बातमीदाराकडून सिंदूर येथील बसाप्पा आक्कीवाट यांच्या हळदीच्या पिकात बेकायदेशीर गांजाची लागवड केल्याची माहिती मिळाली आणि पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली आहे.
‘न्हावा-शेवा’तून 14 कोटींची विदेशी सिगारेट जप्त, सहा महिन्यातील तिसरी घटना, अद्याप कोणालाही अटक नाहीhttps://t.co/Ju5dKWfYK2
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 3, 2020
Marijuana Seized In Sangli
संबंधित बातम्या :
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक, साडे पाच हजाराच्या ड्रेस ऐवजी रद्दी, वापरलेल्या साड्या पार्सल
कल्याणचा इश्कबाज चोरटा; पाच गर्लफ्रेंड्सची हौस भागविण्यासाठी मोबाईल चोरी