स्वच्छतेचा अतिरेक, नोटा धुवून सुकवणे, मुलांना वारंवार आंघोळ, वैतागलेल्या पतीकडून पत्नीची हत्या 

पत्नीच्या साफसफाईच्या सवयीला कंटाळून पतीने पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली (Man kills wife due to over cleaning habits) आहे.

स्वच्छतेचा अतिरेक, नोटा धुवून सुकवणे, मुलांना वारंवार आंघोळ, वैतागलेल्या पतीकडून पत्नीची हत्या 
Follow us
| Updated on: Feb 20, 2020 | 11:34 AM

बंगळुरु : पत्नीच्या साफसफाईच्या सवयीला कंटाळून पतीने पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली (Man kills wife due to over cleaning habits) आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर पतीनेही गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कर्नाटकमध्ये ही घटना घडली आहे. पुत्तामणी (38) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून शांतामूर्ती (40) असे तिच्या पतीचे नाव आहे. या दोघांचे 15 वर्षांपूर्वी लग्न झाले होते.

नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुत्तामणी स्वच्छतेचा अतिरेक करायची. ती अंधश्रद्धेवर फार विश्वास ठेवत. तिच्या घरी येणाऱ्या व्यक्तीलाही ती घरात येण्यापूर्वी आंघोळ करुन या असे सांगत. यावरुन अनेकांनी त्यांच्याकडे जाणं-येणं बंद केलं होतं.

इतकंच नव्हे तर, ती आपल्या 12 आणि 7 वर्षीय मुलांना दिवसांतून कित्येकदा आंघोळ घालायची. विशेष म्हणजे तिचा पती शांतामूर्ती तिला जे पैसे देत, त्या नोटाही ती धुवून सुकवून वापरत असे. “नोटांना विविध जातीचे लोक स्पर्श करतात. त्यामुळे नोटा अपवित्र होतात,” असे पुत्तामणी अनेकांना सांगत.

तिच्या या साफसफाईच्या सवयीला अनेकजण कंटाळले होते. यावरुन त्या पती-पत्नीमध्ये कायम भांडण (Man kills wife due to over cleaning habits) होतं.

काल (19 फेब्रुवारी) शांतामूर्ती आणि पुत्तामणी यांच्यात पुन्हा साफसफाईच्या कारणावरुन टोकाचे भांडण झाले. यावेळी शांतामूर्तीच्या संयमाचा बांध तुटला आणि त्याने शेतात बाजूला असलेली कुऱ्हाड उचलत तिच्यावर वार केले. पत्नीची हत्या केल्यानंतर शांतामूर्ती घरी परतला. त्याने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.

त्यानंतर त्यांची दोन्ही मुले शाळेतून आल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. मुलं शाळेतून परतल्यानंतर त्यांनी आपल्या वडिलांनी आत्महत्या केल्याचं पाहिलं. याबाबत शेजाऱ्यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी पुत्तामणीची शोधशोध सुरु केली. त्यानंतर तिचा मृतदेह शेतात (Man kills wife due to over cleaning habits) मिळाला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.