रस्त्याने बोलत जाणाऱ्यांचे मोबाईल पळवायचे, सोलापूर पोलिसांकडून तीन आरोपींना बेड्या
मोबाईल बरोबरच खिशातील ऐवज लंपास करणारी टोळी सोलापूर शहर पोलिसांनी गजाआड केली आहे.
सोलापूर : मोबाईलवर बोलत असताना हिसका मारून त्यांच्याजवळील ऐवज आणि मोबाईल लंपास होण्याचं प्रमाण सोलापुरात चांगलंच वाढलं होतं. हीच मोबाईल आणि ऐवज लंपास करणारी टोळी सोलापूर शहर पोलिसांनी गजाआड केली आहे. सोलापूरच्या विजापूरनाका पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून त्यांच्याकडून अनेक मोबाईल, मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. (Two Wheeler Driver Snatches Mobile phone Police Arrested 3 Accused)
सोलापूर शहरात मोबाईलवर बोलत असताना हिसका मारून घेऊन जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे सर्वसामान्य लोकांबरोबरच पोलिसांनाही या टोळीला गजाआड करण्याचे मोठे आव्हान होते. याप्रकरणी विजापूर नाका पोलिसांना यश आलं असून त्यांनी अंबादास शेखर गायकवाड, दीपक मोहन जाधव, मोहित नागेश जाधव या तीन जणांना सापळा रचून ताब्यात घेतलं आहे.
यातील तिघे संशयित विजापूर रोडवरील कुबेर कॉम्प्लेक्स येथे चोरीचे मोबाईल विकण्याच्या कामासाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. तिघेही तीन मोटार सायकलवर तिथे आले असता पोलिसांनी त्यांना हटकल्यावर पळून जाण्याच्या प्रयत्न करत असताना या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडील मोबाईल, मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या तिघांकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. (Two Wheeler Driver Snatches Mobile phone Police Arrested 3 Accused)
संबंधित बातम्या
मोबाईल शॉपीवर दरोडा; 16 लाखांचे मोबाईल लंपास, रिकामे बॉक्स मात्र दुकानातच
कोल्हापुरात मोबाईलचं दुकान फोडलं, साडे 16 लाखांचा मुद्देमाल लंपास