मौज-मजेसाठी महागड्या दुचाकींची चोरी, उल्हासनगरातील तिघे ताब्यात
मौज-मजेसाठी तरुणांना चक्क वाहन चोरीचा छंद जडल्याचा प्रकार उल्हासनगर शहरात समोर आला आहे.
उल्हासनगर : मौज-मजेसाठी तरुणांना चक्क वाहन चोरीचा छंद जडल्याचा (Ulhasnagar Bike Thief) प्रकार उल्हासनगर शहरात समोर आला आहे. वाहनांची चोरी करणाऱ्या या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीच्या महागड्या 10 दुचाकी हस्तगत केल्या आहेत (Ulhasnagar Bike Thief).
याप्रकरणी पोलिसांनी एक आरोपी आणि दोन विधीसंघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडून सात अॅक्टिव्हा आणि तीन मोटारसायकल असे एकूण 3 लाख 50 हजार रुपये किमतीच्या दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.
उल्हासननगर भागात वाहन चोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस उपआयुक्त परिमंडळ 4 यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. याबाबत उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या टोळीने आणखी किती दुचाकी चोरी केल्यात आहेत याचा तपास आता पोलीस करत आहे.
पुण्यात ‘स्पेशल 26’, लष्कर भरती रॅकेटचा भांडाफोड, लष्कराच्या कर्मचाऱ्यांचाही सहभागhttps://t.co/6t8KPKTNRz@PuneCityPolice #PuneCrime
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 2, 2020
Ulhasnagar Bike Thief
संबंधित बातम्या :
रेल्वे ट्रॅकवरुन चालताना लूट, तरुणाला आठ वर्षांनी दागिने परत मिळाले