एमडीचे शिक्षण घेणाऱ्या डॉक्टर तरुणीची निर्घृण हत्या, आरोपी डॉक्टर ताब्यात
एसएन मेडिकल कॉलेजमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या डॉक्टर योगिता गौतमची डोके चिरडून हत्या करण्यात आली.
लखनऊ : एमडीचे शिक्षण घेणाऱ्या डॉक्टर तरुणीच्या हत्याकांडाने उत्तर प्रदेश हादरले आहे. आग्रा येथील सरोजिनी नायडू मेडिकल कॉलेजमध्ये एमडी करणारी डॉक्टर योगिता गौतम हिची निर्घृण हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे. (Uttar Pradesh MD Student Murder in Agra Doctor Detained)
मृतदेहाची ओळख पटल्यानंतर ही बातमी पसरली तेव्हा एसएन मेडिकल कॉलेजचे सहकारी डॉक्टरही अवाक झाले. एसएन मेडिकल कॉलेजमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या डॉक्टर योगिता गौतमची डोके चिरडून हत्या करण्यात आली.
बमरौली कटारा भागात बुधवारी तिचा मृतदेह सापडला. मृतदेहाचे डोके आणि पोटावर वजनदार लाकूड ठेवले होते. पोलिस दिवसभर तिची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी डॉक्टर योगिता गौतम देखील बेपत्ता होती. एसएन मेडिकल कॉलेजजवळील राजमुंडी येथे राहुल गोयल यांच्या घरात ती भाड्याने राहत होती. त्या आधारे संध्याकाळी उशिरा तिची ओळख पटली.
योगिता ही दिल्लीतील नजबगडची रहिवासी होती. पोलिसांसमोर मोठा प्रश्न असा आहे की एसएन मेडिकल आणि राजामुंडी हे केवळ एक किलोमीटरच्या अंतरावर आहेत, मग डॉ. योगिता फतेहाबाद रोडवरील डौकी पोलिस स्टेशन भागात कशी पोहोचली. या खुनामागे एखाद्या परिचित व्यक्तीचा सहभाग असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
डॉक्टर ताब्यात
योगिता मंगळवारी संध्याकाळपासून बेपत्ता होती. कुटुंबियांच्या तक्रारीनुसार एमएम गेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जालौन पोलिसांनी आरोपी डॉ. विवेक तिवारी यांना ताब्यात घेतले आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार आरोपी डॉक्टर योगिताला त्रास द्यायचा आणि धमकावतही होता.
डॉ. विवेक तिवारी सध्या जालौन येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. योगिता यांच्यासह आरोपी डॉ. विवेक तिवारी यांनी एसएस मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आहे. (Uttar Pradesh MD Student Murder in Agra Doctor Detained)
आरोपी डॉ. विवेक तिवारी यांची कार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हत्येमध्ये वापरलेली गाडी व इतर साहित्य जप्त करण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. एसएसपी बबलू कुमार यांनी या हत्याकांडाचा लवकरच उलगडा होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
The body of a female doctor of #Agra‘s S.N. Medical College has been found, after her family lodged a complaint that she was missing, police said, adding that a suspect was in custody.
Agra police recovered the body Yogita Gautam on Wednesday from highway near Bamrauli Katara. pic.twitter.com/bFDVxh5gPM
— IANS Tweets (@ians_india) August 20, 2020
(Uttar Pradesh MD Student Murder in Agra Doctor Detained)