AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SSC HSC 17 Number Form: दहावी-बारावी 17 नंबर फॉर्म डायरेक्ट लिंक! विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज भरावा, 14 ऑगस्ट अंतिम मुदत

10th 12th 17 no Form: दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेसाठी बसणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो स्कॅन करुन विद्यापीठाने दिलेल्या संकेतस्थळावर अपलोड करावे लागणार आहेत.

SSC HSC 17 Number Form: दहावी-बारावी 17 नंबर फॉर्म डायरेक्ट लिंक! विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज भरावा, 14 ऑगस्ट अंतिम मुदत
CBSE Compartment 2 ResultsImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 8:43 AM

10th 12th 17 No Form: दहावी बारावीचा 17 नंबरचा अर्ज (10th 12th 17 no Form) उद्यापासून म्हणजेच 29 जुलैपासून भरण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट पर्यंत ठेवण्यात आली आहे. राज्यात दहावी-बारावी बोर्डाचे निकाल (10th 12th Maharashtra Board Results) दोन महिन्यांपूर्वी जाहीर करण्यात आले. तर बोर्ड परिक्षा देण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांना विद्यार्थ्यांना 17 क्रमांकाचा फॉर्म भरण्यासाठी येत्या 29 जुलैपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्टपर्यंत (Last Date For 17 Number Form) ठेवण्यात आली आहे. दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेसाठी बसणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो स्कॅन करुन विद्यापीठाने दिलेल्या संकेतस्थळावर अपलोड करावे लागणार आहेत. तसेच 26 ऑगस्ट पर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षेचे शुल्क, मूळ कागदपत्रे अर्ज करण्यासाठी नमूद केलेल्या संपर्क केंद्रात द्यायचे आहेत.

पुढील संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार:

दहावीसाठी 17 क्रमांकाचा फॉर्म भरण्यासाठी- http://form17.mh-ssc.ac.in

बारावीसाठी 17 क्रमांकाचा फॉर्म भरण्यासाठी- http://form17.mh-hsc.ac.in

अर्ज करण्यासाठी

  1. शाळा सोडल्याचा दाखला
  2. आधारकार्ड
  3. पासपोर्ट फोटो
  4. परीक्षेचे शुल्क
  5. मूळ कागदपत्रे
  6. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी- दिव्यांगत्वाचे प्राधिकृत प्रमाणपत्र

शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांची माहिती

त्याचसोबत अर्ज भरताना काही अडचणी आल्यास त्याबद्दल संबंधित माहिती विद्यार्थ्यांना संपर्क केंद्राच्या क्रमांकावरून मिळवू शकता. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्राधिकृत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये होणाऱ्या दहावी-बारावी परीक्षेसाठी 17 नंबरचा अर्ज भरण्यास 29 जुलैपासून सुरुवात होणार आहे. विद्यार्थी नियमित शुल्कासह 24 ऑगस्टपर्यंत परीक्षेचा ऑनलाइन अर्ज भरू शकतात. तसेच 1 ते 26 ऑगस्टदरम्यान विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज ऑनलाइन नावनोंदणी व मूळ कागदपत्रे संपर्क केंद्र किंवा शाळेत जमा करायची आहेत, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.

पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News...
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News....