दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठी गूड न्यूज, सवलतीचे गुण कुणाला मिळणार? वाचा
गेल्या दोन वर्षात कोरोनाची विद्यार्थ्यांनाही मोठी झळ बसली आहे. ती हानी भरून काढण्याचा सध्या शिक्षण विभागाचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना आणखी एक गूजन्यूज दिली आहे.
मुंबई : दहावी, बारावीच्या परीक्षा (10th Exam, 12th Exam) आता जवळ आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी (Students) सध्या जोमाने अभ्यासाला लागणार आहेत. साधारण दोन वर्षानंतर बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन (Online Exam) होणार आहेत. कारण गेल्या दोन वर्षात कोरोनाची विद्यार्थ्यांनाही मोठी झळ बसली आहे. ती हानी भरून काढण्याचा सध्या शिक्षण विभागाचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना आणखी एक गूजन्यूज दिली आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडास्पर्धेतील सहभागाता विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. कारण आधारावर सवलतीचे गुण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.कोविड-19 मुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे शालेय विद्यार्थ्यांचे नियमित शिक्षण बाधित होऊ नये यासाठी शालेय शिक्षण विभागाने विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे मैदानात घाम गाळणाऱ्या विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.
कोणत्या विद्यार्थ्यांना सवलत मिळणार
कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने घेण्यात येत आहेत. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता सातवी व इयत्ता आठवीमध्ये विद्यार्थ्यांचा क्रीडास्पर्धेतील सहभाग विचारात घेण्यात येऊन त्यांना सन 2021-22 या वर्षाकरिता सवलतीचे क्रीडा गुण देण्यात यावेत. तसेच इयत्ता बारावी परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता नववी व दहावीमधील विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेऊन सन 2021-22 करिता सवलतीचे क्रीडा गुण देण्यात यावेत, असे निर्देश राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिवांना देण्यात आल्याचे मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. ही सवलत केवळ सन 2021-22 च्या परीक्षेकरिताच देण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
दोन वर्षांनंतर शाळा फुलल्या
गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे अनेक महिने शाळेची घंटा कानावर पडायची बंद झाली होती. शाळा कॉलेजच्या कट्ट्यावरची धमलही बंद होती. आपल्याला कित्येक महिने कोरोनने घरातच काढायला लावले आहेत. अशात विद्यार्थ्यांचे पूर्ण नुकसान होऊ नये, यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू होते. मात्र प्रत्यक्ष शिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण यात मोठी तफावत आहे. आता विद्यार्थ्याचेही लसीकरण बऱ्यापैकी झाल्याने खबरदारी घेत शाळा आणि कॉलेज पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. कारण काही दिवसांवरच दहावी, बारावीच्या परीक्षा येऊन ठेपल्या होत्या. सुरक्षित वातावरणात या परीक्षा पार पाडण्यावर राज्य शासनाचा भर असणार आहे. काही विद्यार्थ्यांना क्रिडा मैदानात काही वेळ घालवावा लागत असल्याने इतररांच्या तुलनेत त्यांच्यावर जास्त ताण येतो, मात्र शिक्षण विभागाने ही सवलतीचे गुण देऊन दिलासा दिला आहे.
SSC, CHSL Exam 2022 : उमंग ॲपद्वारे तुम्ही सुद्धा भरू शकतात अर्ज, जाणून घ्या प्रक्रिया !