AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NEET : यंदा पहिल्यांदाच नीट होणार भारताबाहेर.. परीक्षा केंद्रांची यादी पाहिली का?

नीट 2022 परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. ‘एनटीए’ने सांगितल्यानुसार यंदा पहिल्यांदाच नीटची परीक्षा भारताबाहेर घेण्यात येत आहे. ही परीक्षा विदेशातील 14 विविध परीक्षा केंद्रांमध्ये घेण्यात येणार आहे.

NEET : यंदा पहिल्यांदाच नीट होणार भारताबाहेर.. परीक्षा केंद्रांची यादी पाहिली का?
पहिल्यांदाच नीट होणार भारताबाहेर..
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 12:10 PM

नवी दिल्ली : ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ने नीट युजीसाठी (NEET) रजिस्ट्रेशन प्रक्रियेला (Registration process) सुरुवात केली आहे. ‘एनटीए’व्दारे (NTA) जाहिर करण्यात आलेल्या नोटीफिकेशननुसार, नीट युजी 2022 परीक्षा 17 जुलै रोजी होणार आहे. नीट 2022 च्या माहिती पत्रकानुसार, पात्रतेचे मापदंड, रजिस्ट्रेशन प्रक्रिया, शुल्क आदी सर्वांची माहिती ‘एनटीए’च्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. तसेच यंदा पहिल्यांदाच नीटची परीक्षा भारताबाहेरील विविध 14 परीक्षा केंद्रांवर होणार असल्याची माहितीदेखील ‘एनटीए’तर्फे देण्यात आली आहे. या निर्णयामुळे या परीक्षेच्या व्याप्तीत बरेच बदल झाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यासोबतच अधिकाधिक मुलांना वैद्यकीय प्रवेश परीक्षेला बसण्याचीदेखील संधी उपलब्ध होणार आहे.

दरम्यान, नीट 2022 च्या रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख असलेल्या 6 मेपर्यंत पदवीधर वैद्यकीय परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केले जाऊ शकते. दरम्यान कोरोना नियमांचे पालन करुन देशभरातील नियोजीत सर्व परीक्षा केंद्रांमध्ये नीट परीक्षा घेतल्या जाणार आहे. या वर्षी नीट परीक्षा इंग्रजी, हिंदीसह अन्य 11 प्रादेशिक भाषांमध्ये घेण्यात येणार आहे. परीक्षांच्या अटींमध्ये बदल केल्यानुसार, या वेळी नीट परीक्षा देण्यासाठी कमाल वयोमर्यादा हटवण्यात आली आहे.

असा करा अर्ज

1) नीट युजी 2022 साठी nta.nic.in या वेबसाईटला भेट द्या.

2) नीट युजी रजिस्ट्रेशन 2022 वर क्लिक करा.

3) रजिस्ट्रेशन करताना व्यक्तिगत व शैक्षणिक माहिती भरावी, सोबत ड्रेस कोड व परीक्षा केंद्र निवडा.

4) आवश्‍यक असलेली सर्व कागदपत्रे अपलोड करा.

5) ऑनलाइन पध्दतीने नीट रजिस्ट्रेशनचा शुल्क भरा.

6) भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून तुमच्याजवळ ठेवा.

दरम्यान, वैद्यकीय, दंतचिकित्सा, पुशचिकित्सा, बीएससी नर्सिंग आणि बीएससी जीवनशास्त्र जागांच्या प्रवेशासाठी नीट परीक्षा एकूण 13 भाषांमध्ये ऑफलाइन पध्दतीने घेतली जात असते.

इतर बातम्या :

Milk Rate : शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता, गायीच्या पाठोपाठ म्हशीच्या दूध दरातही वाढ, वाढत्या उन्हाचा काय परिणाम?

Accident CCTV | बघता-बघता टँकर थेट बसमध्ये घुसला, पुणे-यवतमाळ ट्रॅव्हल्सच्या अपघाताची भयंकर सीसीटीव्ही दृश्यं

INS Vikrant: गोळवलकर, देवरस, मुखर्जी, हेडगेवार, भागवतांचा जीव तीळ तीळ तुटला असेल; राऊतांची खोचक टीका

पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.