Maharashtra college Reopen | कृषी विद्यापीठ, संलग्न महाविद्यालये 20ऑक्टोबरपासून सुरु, कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश
उच्च व तंत्र शिक्षण विभागाने 13 ऑक्टोबर 2021 रोजीच्या परिपत्रकान्वये सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यीत विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयामधील नियमित वर्ग दिनांक 20 ऑक्टोबरपासून सुरु करण्यास मान्यता दिली आहे. याच निर्णयाचा आधार घेत कृषी विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्न विद्यालये आणि महाविद्यालये सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
मुंबई : राज्यातील सर्व कृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित शासकीय व खासगी विनाअनुदानित विद्यालये व महाविद्यालये 20 ऑक्टोबरपासून सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तशी माहिती राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
कृषी विद्यापीठे, विद्यालये, महाविद्यालये सुरु
राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील इयत्ता 12 वीपर्यंतचे वर्ग चार ऑक्टोबरपासून सुरु करण्यात आले आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थी हे 18 वर्षावरील असून बहुतेक विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. याचबरोबर राज्यातील कोविड-19 बाधित रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात कमी झालेली आहे. सद्यस्थितीत ही साथ नियंत्रणात आल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने उच्च व तंत्र शिक्षण विभागाने 13 ऑक्टोबर 2021 रोजीच्या परिपत्रकान्वये सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यीत विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयामधील नियमित वर्ग दिनांक 20 ऑक्टोबरपासून सुरु करण्यास मान्यता दिली आहे. याच निर्णयाचा आधार घेत कृषी विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्न विद्यालये आणि महाविद्यालये सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
वसतीगृहे टप्याटण्याने सुरु करावेत
अर्थात विद्यालये अथवा महाविद्यालय, विद्यापीठात येताना सर्व 18 वर्षावरील विद्यार्थ्यांनी लसीचे दोन डोस घेतलेले असावेत. ज्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात उपस्थित राहता येणार नाही, त्यांच्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून द्यावी. 50 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेने वर्ग सुरु करण्याविषयी स्थानिक प्रशासनाशी विचारविनिमय करून कृषी विद्यापीठांनी निर्णय घ्यावा. त्यानुसार महाविद्यालयांना सविस्तर मार्गदर्शक सूचना, एसओपी द्यावी. वसतीगृहे टप्याटण्याने सुरु करावेत. ज्या विद्यार्थ्यांनी कोविड-19 ची लस घेतलेली नाही, त्यांच्याकरिता स्थानिक जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवावी. तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेदेखील लसीकरण प्राधान्याने करून घ्यावे, अशा सूचना कृषीमंत्री श्री. भुसे यांनी दिल्या.
संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने सर्व शासकीय सूचनांचे पालन करावे
कोविड 19 च्या व्यवस्थापनाबाबतचे राष्ट्रीय निर्देश, कामांच्या ठिकाणाबाबतचे अतिरिक्त निर्देश, राज्य शासनाने वेळोवेळी काढलेली मार्गदर्शक तत्वे किंवा मानक कार्यप्रणाली सर्व कृषी विद्यापीठ, विद्यालये व महाविद्यालयांना लागू असल्यामुळे कोरोना संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने सर्व शासकीय सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही कृषीमंत्री भुसे यांनी केले आहे.
इतर बातम्या :
सहकाराच्या मुद्द्यावर अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांची सकारात्मक बैठक, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
SSC HSC Board Supplementary Exam Result | इयत्ता दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेचा बुधवारी निकाल
(agricultural universities and colleges will start from 20th October information given by dadaji bhuse)