AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी ! राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरु होणार, वर्षा गायकवाड यांची माहिती

सध्या राज्यात इयत्ता आठवीत ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरु आहेत. मात्र आता येत्या 17 ऑगस्ट पासून राज्यातील सर्व शाळा सुरु होतील, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

मोठी बातमी ! राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरु होणार, वर्षा गायकवाड यांची माहिती
SCHOOL
Follow us
| Updated on: Aug 06, 2021 | 9:43 PM

मुंबई : राज्यात अनेक दिवसांपासून शाळा बंद आहेत.  मात्र आता येत्या 17 ऑगस्ट पासून राज्यातील शाळा सुरु करण्यावर विचार सुरु आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली. त्या मुंबईत पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी बोलताना त्यांनी सध्याची कोरोनास्थिती तसेच बंद असलेल्या शाळांवर भाष्य केले. (all school of Maharashtra state will start from 17 August information given by Varsha Gaikwad)

शिक्षण विभागाची पुढील आठवड्यात बैठक होणार

“राज्यातील सर्व शाळा लवकरच सुरू करण्याचा राज्याच्या शिक्षण विभागाचा विचार आहे. येत्या 17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याचा विचार करत आहोत. त्याबाबत निर्णय घेण्यासाठी शिक्षण विभागाची पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी आहे. तसेच नियम शिथील केलेले आहेत, अशा ठिकाणी आम्ही ग्रामीण भागात पाचवी ते आठवी वर्गाच्या शाळा सुरु करण्याचा विचार करत आहेत. तसेच शहरी भागात आठवी ते बारावी वर्गाच्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरु करण्याचा आमचा मानस आहे. येणाऱ्या 17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याचा आमचा विचार आहे,” असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.

शाळा सुरू करण्याच्या शिक्षण विभागाच्या हालचाली

तसेच 1 ऑगस्टला ब्रेक द चेनअंतर्गत नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. या नियमावलीत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत. मागील वर्षाच्या मार्च 2020 पासून राज्यातील सर्व शाळा कोरोनामुळे बंद आहेत. त्यामुळे आता लवकरच शाळा सुरू करण्याच्या शिक्षण विभागाच्या हालचाली सुरु आहेत. असेही गायकवाड म्हणाल्या.

मुख्यमंत्र्यांकडून आदेश आल्यावर अंमलबजावणी

दरम्यान, राज्य सरकारने राज्यातील सर्व खासगी शाळांचे शुल्क 15 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार याबाबत गायकवाड यांनी भाष्य केलं. 15 टक्के फी कमी करण्याचा निर्णय झालेला आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांकडून आदेश आल्यावर त्याची अंमलबजावणी होईल, असे गायकवाड यांनी सांगितलं.

इतर बातम्या :

न्यायाधीशांना धमक्या येऊनही CBI, IB आणि पोलिसांकडून मदत नाही : सर्वोच्च न्यायालय

Special Report | दिल्लीत गुप्त बैठका कशासाठी ? नेमकं काय शिजतंय ?

मुंबई विद्यापीठात पदवीसाठी प्रवेश हवाय? नावनोंदणी सुरु, संपूर्ण प्रक्रिया एका क्लिकवर

(all school of Maharashtra state will start from 17 August information given by Varsha Gaikwad)

पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.