Schools Open | औरंगाबादेत महापालिकेच्या आणखी तीन सीबीएसई शाळा, सोमवारपासून प्रवेश प्रक्रिया सुरु
Aurangabad Schools | औरंगाबाद महापालिकेने यंदा आणखी तीन सीबीएसई शाळा सुरु केल्या आहेत. येत्या सोमवारपासून येथील प्रवेश प्रक्रिया सुरु होईल.
औरंगाबादः येत्या सोमवारपासून म्हणजेच 13 जूनपासून शहरातील अनेक खासगी, सीबीएसईच्या शाळा सुरु होत आहेत. महापालिकेच्या सीबीएसई शाळा (CBSE Schools) नव्या शैक्षणिक वर्षासाठी सज्ज झाल्या आहेत. औरंगाबाद महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे 13 जूनपासून सीबीएसई शाळांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. मागील वर्षी गारखेडा आणि उस्मानपुरा शाळेत सीबीएसईचे (CBSE Classes) वर्ग सुरु झाले. आता नव्या शैक्षणिक वर्षात नव्या तीन ठिकाणी CBSE शाळा सुरु केल्या जात आहेत. त्यामुळे स्टेट बोर्डाव्यतिरिक्त शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी या शाळा उपयुक्त ठरणार आहेत. अर्थात महापालिकेच्या (Municipal Corporation Schools) या शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्यांसाठी प्राधान्य कुणाला द्यायचे, याचे काही निकष ठरवण्यात आले आहेत. त्यानुसारच नियमात बसणाऱ्यांना आधी प्रवेश दिला जाईल, असा निर्णय मनपाच्या शिक्षण विभागाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
मनपाच्या आता 5 CBSE शाळा
मागील वर्षीच्या दोन आणि नव्यानं सुरु झालेल्या तीन अशा औरंगाबाद महापालिकेच्या शहरात तीन सीबीएसई शाळा असतील. नव्याने सुरु झालेल्या तीन ठिकाणी सोमवारपासून प्रवेश प्रक्रिया सुरु केली जाईल. – गारखेडा – उस्मानपुरा -प्रियदर्शिनी विद्यालय, मयूरबन कॉलनी – एन-7 सिडको – शहागंज येथील चेलीपुरा
नव्या शाळेत कोणत्या वर्गांना प्रवेश
नव्यानं सुरु झालेल्या तीन सीबीएसई शाळांमध्ये ज्युनियर केजी आणि सीनीयर केजीसाठी प्रवेश दिले जाणार आहेत. या प्रवेशासाठीचे रजिस्ट्रेशन फॉर्म सोमवारी सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत उपलब्ध राहतील, अशी माहिती अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आली. या शाळांच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात मनपा शिक्षण विभागप्रमुख तथा उपायुक्त नंदा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक झाली. या प्रसंगी शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे, सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार, समग्र शिक्षा अभियान कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे, सीबीएसई शाळेचे समन्वयक शशिकांत उबाळे, मुख्याध्यापिका संगीता ताजवे व रशिद उन्निसा यांची उपस्थिती होती.
प्रवेशात कुणाला प्राधान्य?
सोमवारपासून मनपाच्या नव्या तिन्ही शाळांमध्ये सोमवारपासून प्रवेश प्रक्रिया सुरु होत आहे. सीबीएसईचे वर्ग सुरु होणाऱ्या शाळांत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांचे भाऊ किंवा बहीण त्या शाळेत आधीच शिक्षण घेत असल्यास त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच परितक्ता, एकल पालक स्त्री व सैनिकांचे पाल्य, पालिकेतील वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱअयांना प्राधान्य दिले जाणार आहे.