AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

jee advanced entrance exam: बदलापूरची पोरं अभ्यासात आणि खेळातही हुश्शार!, जेईई अ‍ॅडव्हान्स प्रवेश परीक्षेत नेत्रदीपक कामगिरी

jee advanced entrance exam: महामुंबईची 'सॅटेलाईट सिटी' म्हणून ओळख बनलेल्या बदलापूरमधील विद्यार्थी शिक्षणक्षेत्रात ताऱ्यांसारखे तळपत आहेत. 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठीच्या जेईई अॅडव्हान्स प्रवेश परीक्षेत तब्बल 25 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन पात्र ठरले.

jee advanced entrance exam: बदलापूरची पोरं अभ्यासात आणि खेळातही हुश्शार!, जेईई अ‍ॅडव्हान्स प्रवेश परीक्षेत नेत्रदीपक कामगिरी
बदलापूरची पोरं अभ्यासात आणि खेळातही हुश्शार!, जेईई अ‍ॅडव्हान्स प्रवेश परीक्षेत 25 विद्यार्थी उत्तीर्णImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 7:01 PM

ठाणे: महामुंबईची ‘सॅटेलाईट सिटी’ म्हणून ओळख बनलेल्या बदलापूरमधील विद्यार्थी शिक्षणक्षेत्रात ताऱ्यांसारखे तळपत आहेत. 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठीच्या जेईई अॅडव्हान्स प्रवेश परीक्षेत (jee advanced entrance exam) तब्बल 25 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन पात्र ठरले, तर एका विद्यार्थ्याने ‘नीट’ परीक्षेत 95 टक्के गुण मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. विशेष म्हणजे, बदलापूरमधील पोदार ब्रायो इंटरनॅशनल स्कूलच्या (poddar brio international school) विद्यार्थ्यांनी बदलापूरकरांना (badlapur) अभिमान वाटेल अशी ही कामगिरी केली आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी सर्वोत्तम व्हावी यासाठी पारंपरिक तसंच नावीन्यपूर्ण शिक्षणपद्धतीने विद्यार्थ्यांना घडवण्यावर पोदार ब्रायो इंटरनॅशनल स्कूल भर देतं. आयआयटी- जेईईसह (जॉइंट एन्ट्रन्स टेस्ट) ही शाळा विद्यार्थ्यांकडून नॅशनल सायन्स ऑलिम्पियाड, नॅशनल स्टँडर्ड एक्झामिनेशन इन ज्युनिअर सायन्स, होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा, चित्रकला इलिमेंटरी आणि इंटरमिडिएट परीक्षा, स्पेलबी इंटरनॅशनल, नॅशनल अॅस्ट्रोनॉमी अॅंड सायन्स ऑलिम्पियाड, नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन या परीक्षांचीही तयारी करुन घेते.

विद्यार्थ्यांच्या अभ्यास-परीक्षाविषयक शंकांचं निरसन करण्यासाठी विशेष कक्ष, स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन आम्ही उपलब्ध करुन दिलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या यशामागे विद्यार्थी, त्यांचे कुटुंबीय आणि शाळा यांमधील बळकट नातं महत्वाचं ठरतं असा आमचा विश्वास आहे”, असं मत पोदार ब्रायो इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका रश्मी सिंग यांनी सांगितलं. 2015पासून शाळेच्या 200हून अधिक विद्यार्थ्यांनी जिल्हा तसंच राष्ट्रीय पातळवरील क्रीडा स्पर्धांमध्ये विविध बक्षीसं तसंच पारितोषिकं मिळवली आहेत.

शुल्कात 15 टक्के सवलत

“करोना संकटकाळात शाळा फी कमी करण्याबाबत राज्य शासनाकडून कोणतीही सक्ती करण्यात आली नव्हती, तरी आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही खंड पडू नये, पालकांच्या खालावलेल्या आर्थिक स्थितीचा करुन शाळेच्या फीमध्ये 15 टक्के सवलत दिली”, अशी माहितीही मुख्याध्यापिका रश्मी सिंग यांनी दिली.

अनाथाश्रमांना भेटी

“विद्यार्थ्यांमध्ये योग्य वयातच सामाजिक भान निर्माण व्हावं यासाठी अनाथालयं, वृद्धाश्रम, दत्तक केंद्र आदी ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांच्या भेटी घडवून आणल्या जातात. गरजूंसाठी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून दानयज्ञ राबवून वंचितांसाठी विविध वस्तू उपलब्ध करुन दिल्यामुळे विद्यार्थ्यांनाही आपली स्वत:ची सामाजिक जबाबदारी समजते आणि एक नागरिक म्हणून ते अधिक समृद्ध होतात” असंही पोदार ब्रायो इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका रश्मी सिंग यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

खुशखबर ! विद्यार्थ्यांना मिळणार नवा कोरा ‘डिझाईनर गणवेश’

NCERT : NCERT पुस्तकातील कथेवरून वाद ! NCPCR कडून तक्रार दाखल

NEET : NEET परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा रद्द, प्रवेश परीक्षेचं वेळापत्रक लवकरच होणार जाहीर

पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक, अधिकारी मारले; लेफ्टनंट जनरल घईंची माहिती
पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक, अधिकारी मारले; लेफ्टनंट जनरल घईंची माहिती.
पाकिस्तानी ऑफिशियल भिखमंगे; ओवेसींनी पुन्हा पाकिस्तानची लक्तरं काढली
पाकिस्तानी ऑफिशियल भिखमंगे; ओवेसींनी पुन्हा पाकिस्तानची लक्तरं काढली.
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.