दहावीच्या परीक्षांबाबत अंतिम निर्णयानंतर कार्यवाही, पालकांमध्ये दोन मतप्रवाह: दिनकर पाटील
दहावी बारावीच्या परीक्षांची तयारी यापूर्वीच झाली असल्याचं दिनकर पाटील यांनी सांगितलं आहे. Dinkar Patil SSC Exam
पुणे: दहावी-बारावीच्या परीक्षा घेण्यासंदर्भात संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात निर्णय प्रलंबित असला तरी परीक्षा घेण्याची पूर्ण तयारी आधीच झालेली होती अशी माहिती महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली. याशिवाय विभागीय मंडळ आणि शाळांपर्यंत परीक्षेचे साहित्य पोहचवण्यात आलंय.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीची परिक्षा सुरुवातीला पुढे ढकलण्यात आली होती. नंतर मात्र ती रद्दच करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता, असं दिनकर पाटील म्हणाले. (Balbharati Director Dinkar Paitl said SSC HSC exam preparation was completed)
पालकांमध्ये दहावी बारावी परीक्षांबाबत दोन मतप्रवाह
दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. परीक्षा रद्द झाल्याची माहिती पालक आणि विद्यार्थी यांना आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा आणि राज्य सरकारचा निर्णय आल्यानंतर कार्यवाही केली जाईल, असं देखील दिनकर पाटील यांनी सांगितलं. मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे, सरकारने त्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये कोरोनामुळे दोन मतप्रवाह असल्याचे सरकारने सांगितलंय.
बालभारतीचं पुस्तक छपाईचं काम सुरु
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांच वाटप होते. मात्र, यावर्षी मे महिना संपत आला, तरीही अद्याप महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे म्हणजेच बालभारतीचे पाठ्यपुस्तक छपाईचे काम पूर्ण झालेले नाही. दरम्यान बालभारतीच्या अधिकृत संकेतस्थळावरून (ई-बालभारती) ई-पाठ्यपुस्तके पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध याही वर्षी देण्यात आली आहे.
पुस्तक छपाई लांबण्याचं कारण काय?
शालेय शिक्षण विभागातर्फे समग्र शिक्षा अभियानातंर्गत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जातात. त्यासाठी बालभारतीकडून तब्बल नऊ कोटी पाठ्यपुस्तकांची छपाई केली जाते. मात्र,यंदा छपाईसाठी लागणाऱ्या कागदाच्या खरेदीवर न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे यंदा शाळा सुरू होईपर्यंत म्हणजेच 14 जूनपर्यंत पुस्तके उपलब्ध होणार नसल्याचे दिसून येते. सध्या बालभारतीकडे मागील वर्षीचा पुस्तकांचा काही साठा शिल्लक आहे. त्याशिवाय साठा म्हणून उपलब्ध असलेल्या कागदाचा वापर करून पुस्तकांची छपाई केली जाणार आहे. परंतु, शाळेत जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातात पाठ्यपुस्तक असेलच असे यंदा होणार नाही. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही शाळा ऑनलाइनद्वारेच सुरू होणार आहेत, अशी माहिती बालभारतीचे संचालक दिनकर पाटील यांनी दिली आहे.
विद्यार्थ्यांना पुस्तकं कधी मिळणार? मे महिन्याच्या अखेरपर्यंत बालभारतीकडून पुस्तक छपाई सुरुच, नेमकं कारण काय?https://t.co/ewV8Wcp7p4#Education | #School | #books | #Balbharati
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 27, 2021
संबंधित बातम्या:
दहावीच्या परीक्षा कशा घ्यायच्या? धनंजय कुलकर्णींकडून वर्षा गायकवाड यांना निवेदन, वाचा सविस्तर
(Balbharati Director Dinkar Paitl said SSC HSC exam preparation was completed)