AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad Kabra College: एवढंच राहिलं होतं… एका बाकावर 3 जणांना बसवलं आणि द्या म्हणे पेपर! आरा काय….

झालेल्या प्रकारात विद्यार्थ्यांची चूक नसून त्यांचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. ही चूक नेमकी विद्यापीठाची कि कॉलेजची याबाबत चौकशी केली जाईल. कॉलेज आणि विद्यापीठाच्या ढिसाळ नियोजनामुळे हा सगळा प्रकार घडल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय.

Aurangabad Kabra College: एवढंच राहिलं होतं... एका बाकावर 3 जणांना बसवलं आणि द्या म्हणे पेपर! आरा काय....
Aurangabad college एका बाकावर 3 जणांना बसवलं आणि द्या म्हणे पेपर! Image Credit source: TV9 marathi
Follow us
| Updated on: Jun 02, 2022 | 1:22 PM

औरंगाबाद: औरंगाबादच्या काबरा कॉलेजमध्ये (Aurangabad Vidyapeeth) परीक्षेत उडाला गोंधळ उडालाय. क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी आल्यानं गोधळ उडाल्याचं सांगण्यात आलंय. परीक्षेच्या वेळी एकाच बाकावर चक्क तीन तीन विद्यार्थी (College Students) बसवल्याचं समोर आलंय. बीएस्सी, बायोटेक, बीएसी आयटी या परीक्षेदरम्यान हा प्रकार घडल्याचं दिसून आलंय. कॉलेजच्या स्टोअर रूम मध्ये बाकडं टाकून तिथे विद्यार्थ्यांची बसण्याची सोय करण्यात आलीये. पारदर्शक पणे पार पाडण्यात येणाऱ्या परिक्षांवरच (Examination) आता प्रश्नचिन्ह उभं राहतंय. दरम्यान या गैरसोयीमुळे विद्यार्थ्यांना 15 मिनिटांचा वेळ वाढवून देण्यात आला आहे.

ही चूक अक्षम्य – मंत्री उदय सामंत

बीएस्सी, बायोटेक, बीएसी आयटी या परीक्षेसाठी औरंगाबाद विद्यापीठाकडून काबरा कॉलेज हे परीक्षा केंद्र देण्यात आलं होतं. तब्बल 1200 विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देऊन त्यातल्या फक्त 400 विद्यार्थ्यांची परीक्षेला बसण्याची सोय करण्यात येणं ही चूक अक्षम्य असल्याचं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय. झालेल्या प्रकारात विद्यार्थ्यांची चूक नसून त्यांचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. ही चूक नेमकी विद्यापीठाची कि कॉलेजची याबाबत चौकशी केली जाईल. कॉलेज आणि विद्यापीठाच्या ढिसाळ नियोजनामुळे हा सगळा प्रकार घडल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय.

तीन जणांमध्ये एक प्रश्नपत्रिका

दरम्यान परीक्षेवेळी विद्यार्थ्यांना तीन जणांमध्ये एक प्रश्नपत्रिका देऊन परीक्षा द्यायला लावलीये. झालेल्या गोंधळामुळे अधिकचा वेळ देखील पेपरसाठी देण्यात आलेला आहे. या प्रकाराबाबत सह संचालकांना लगेचच पत्र लिहून वेळ न दवडता चौकशी केली जाईल आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देणार नाही असं आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलंय.

हे सुद्धा वाचा

JEE Mains 2022 ॲडमिट कार्ड

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) लवकरच जेईई मेन 2022 च्या जून परीक्षेचे ॲडमिट कार्ड जाहीर करणार आहे. जून सत्रासाठी जेईई मेन 2022 ची प्रवेशपत्रे एनटीए jeemain.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जातील. ॲडमिट कार्डद्वारे परीक्षा केंद्र आणि शहराची माहिती मिळणार आहे. एनटीए 20 जून 2022 पासून जून सत्र परीक्षा घेणार आहे. परीक्षा सुरू होण्यास अवघे तीन आठवडे शिल्लक आहेत.

पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.