BITS Pilani Admission: बिट्स पिलानीमध्ये 12वी टॉपर्सला थेट प्रवेश मिळणारे, वाचा…
या योजनेअंतर्गत बिट्स पिलानीमध्ये त्याच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी फिजिक्स/केमिस्ट्री/मॅथ्स किंवा फिजिक्स/केमिस्ट्री/बायोलॉजी या विषयांसह बारावीत प्रथम क्रमांक (12th Topper) पटकावला आहे. बिट्स पिलानी मध्ये प्रवेशासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट आहे.

बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स पिलानी (BITS Pilani)यांनी सर्व बोर्डाच्या टॉपर्ससाठी थेट प्रवेश द्यायला सुरुवात केलीये. अभ्यासक्रमांना थेट प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणी (Online Registration) सुरू झालीये. बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविलेले विद्यार्थी बिट्स पिलानीच्या इंटिग्रेटेड अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यास पात्र आहेत. या योजनेअंतर्गत बिट्स पिलानीमध्ये त्याच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी फिजिक्स/केमिस्ट्री/मॅथ्स किंवा फिजिक्स/केमिस्ट्री/बायोलॉजी या विषयांसह बारावीत प्रथम क्रमांक (12th Topper) पटकावला आहे. बिट्स पिलानी मध्ये प्रवेशासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट आहे. संस्थेने केलेल्या अधिकृत घोषणेनुसार, ज्या विद्यार्थ्यांनी आपापल्या बोर्डात प्रथम क्रमांक पटकावला आहे, त्यांनाच बिट्स पिलानीमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. बोर्डाने एकापेक्षा अधिक उमेदवारांना टॉपर घोषित केले असेल, तर सर्वांना प्रवेश दिला जाणार नाही, हे लक्षात घेण्यासारखे आहे. बिट्स पिलानी येथे बीटेक अभ्यासक्रमांमध्ये जास्तीत जास्त चार विद्यार्थ्यांनाच प्रवेश देणार आहे.
बिट्स पिलानीमध्ये थेट प्रवेशासाठी अर्ज कसा करावा?
- थेट प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी, bitsadmission.com अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- होमपेजवर ॲप्लिकेशन लिंकवर क्लिक करावं लागेल.
- उमेदवारांना आपले संपूर्ण नाव, लिंग, जन्मतारीख आणि ईमेल पत्ता येथे भरावा लागेल.
- त्याचा पुढचा टप्पा म्हणून उमेदवारांना त्यांची वैयक्तिक, शैक्षणिक आणि संपर्काची माहिती भरावी लागणार आहे.
- यानंतर आवश्यक ती कागदपत्र अपलोड करावी लागतील.
- उमेदवारांना 10 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि यूपीआयच्या माध्यमातून पेमेंट करता येणार आहे.
- एकदा आपण अर्ज शुल्क भरल्यानंतर, फॉर्म सबमिट करा.
- अर्ज डाऊनलोड करा आणि पुढील वापरासाठी त्याची प्रत काढा.
अटी आणि नियम
अर्ज करणारे उमेदवार भौतिकशास्त्र / रसायनशास्त्र / गणित किंवा भौतिकशास्त्र / रसायनशास्त्र / जीवशास्त्र शाखेचे असावेत. १२ वीच्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये उमेदवारांना सर्वाधिक गुण असावेत. बिट्स पिलानी येथे विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर आणि डॉक्टरेट स्तरावरील पदव्या मिळू शकतात. इंजिनीअरिंग, सायन्स, कॉमर्स, कम्प्युटर ॲप्लिकेशन्स, फार्मसी, मॅनेजमेंट, आर्ट्स, ह्युमॅनिटीज आणि सोशल सायन्ससह अनेक क्षेत्रांतील पूर्णवेळ अभ्यासक्रमही बिट्स पिलानीमध्ये घेतले जातात. नॉन टॉपर्स विद्यार्थ्यांसाठी बिट्स पिलानी BITSAT नावाची प्रवेश परीक्षा घेत असते.