AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CBSE 10th Result 2023 Date: CBSE दहावीचा निकाल लवकरच, आधी रेजिस्ट्रेशन करा! निकाल कसा तपासणार? आधी रेजिस्ट्रेशन करा

CBSE 10th Result 2023 Date: बऱ्याच प्रतीक्षेनंतर आणि फेक न्यूज नंतर अखेर आज CBSE बारावीचा निकाल लागला. आता विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे ती दहावीच्या निकालाची. दहावीचा निकाल कधी लागणार? कुठे लागणार? तो कुठे पाहायचा? वाचा

CBSE 10th Result 2023 Date: CBSE दहावीचा निकाल लवकरच, आधी रेजिस्ट्रेशन करा! निकाल कसा तपासणार? आधी रेजिस्ट्रेशन करा
CBSE 10th result date
Follow us
| Updated on: May 12, 2023 | 1:48 PM

नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी CBSE च्या निकालाबाबत खोटी बातमी पसरविण्यात आली होती. या बातमीनंतर निकालाची तारीख लवकरात लवकर देण्यात यावी अशी विद्यार्थ्यांनी मागणी केली होती. निकाल कधी लागणार याची तारीख आधी CBSE बोर्डाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर किंवा कुठल्याही अधिकृत हँडलवर दिली जाईल असं बोर्डाकडून सांगण्यात आलं. बऱ्याच प्रतीक्षेनंतर आणि फेक न्यूज नंतर अखेर आज CBSE बारावीचा निकाल लागला. आता विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे ती दहावीच्या निकालाची. दहावीचा निकाल कधी लागणार? कुठे लागणार? तो कुठे पाहायचा? वाचा

कधी लागणार निकाल?

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल लवकरच लागण्याची शक्यता आहे. बोर्डाने आज सकाळी 10.12 च्या सुमारास बारावीचा निकाल जाहीर केला आहे. त्यामुळे सीबीएसईचा दहावीचा निकालही आजच जाहीर होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. खरं तर बारावी निकालानंतर आता हा दहावीचा निकाल कधीही लागू शकतो. विद्यार्थी आपला निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात – cbse.gov.in किंवा cbse.nic.in. त्याचबरोबर डिजिलॉकर जाऊन जर तुम्हाला हा निकाल पाहायचा असेल तर आधी खाली दिल्याप्रमाणे रजिस्ट्रेशन करून घ्या.

डिजीलॉकर आणि उमंग ॲपवरही विद्यार्थी सीबीएसई दहावीचा निकाल पाहू शकतात. बोर्ड हे निकाल आयव्हीआरएस आणि एसएमएसद्वारे देखील देऊ शकते.

CBSE 10th marksheet 2023 डिजिलॉकर रजिस्ट्रेशन लिंक

  • आपल्या शाळेने दिलेला 6 अंकी पिन प्रविष्ट करा. (आपल्याकडे 5 अंकी पिन असल्यास नंबरच्या सुरवातीला शून्य (०) लावा)
  • तपशीलांची पडताळणी करा, मोबाइल क्रमांक द्या आणि ओटीपी येईल तो टाका.
  • डिजीलॉकर खाते तयार केले जाईल
  • आता निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी त्यांच्या खात्यात जाऊन मार्कशीट बघू शकतात.

सीबीएसई 10th रिझल्ट 2023 ऑनलाइन: कसा डाउनलोड करणार

  • अधिकृत संकेतस्थळावर जा : results.cbse.nic.in
  • होमपेजवर सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
  • एक नवीन पेज उघडेल
  • आपला रोल नंबर आणि आईचे नाव टाका
  • मार्कशीट बघा आणि डाऊनलोड करा
  • प्रिंट आऊट घ्या

स्पेलिंग आणि इतर तपशील योग्यरित्या टाकण्यासाठी निकाल तपासताना उमेदवारांनी त्यांचे सीबीएसई 10 वी प्रवेश पत्र हातात ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

पिन नंबरशिवाय निकाल तपासता येणार नाही

बोर्डाने बुधवारी नोटीस जारी करत दहावी परीक्षा 2023 चा निकाल लवकरच जाहीर करण्यात येईल, असे म्हटले आहे. बोर्डाच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी निकाल जाहीर झाल्यानंतर डिजीकेबलवर गुणपत्रिका डाऊनलोड करू शकतात. त्यासाठी मंडळाकडून प्रत्येक विद्यार्थ्याला 6 अंकी पिन क्रमांक पाठविण्यात येणार आहे. पिन क्रमांक शाळांना पाठविला जाईल, जो शाळा विद्यार्थ्यांना देतील. सुरक्षेचा विचार करून मंडळाने गेल्या वर्षीपासून ही यंत्रणा सुरू केली आहे.

मुलींनी मारली बाजी

यंदा 12 वी च्या परीक्षेसाठी 16 लाख 96 हजार 770 विद्यार्थी बसले होते. थोड्याच वेळापूर्वी जाहीर झालेल्या निकालात एकूण 87.33 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 5 टक्के कमी आहे. त्रिवेंद्रम झोनने 99.91 टक्क्यांसह सर्वोत्तम कामगिरी केली आहे. यंदा मुलींचा निकाल मुलांपेक्षा चांगला लागला आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल 6 टक्के चांगला लागला आहे. मुलांचा निकाल 84.67 टक्के, तर मुलींचा निकाल 90.68 टक्के लागला आहे.

पहलगाम हल्ल्याचा मुद्दा ब्रिटिश संसदेत उपस्थित; शांततेचं आवाहन
पहलगाम हल्ल्याचा मुद्दा ब्रिटिश संसदेत उपस्थित; शांततेचं आवाहन.
'शत्रू हल्ल्याआधी 10 वेळा विचार करेल', नवाज शरीफच्या मुलीची दर्पोक्ती
'शत्रू हल्ल्याआधी 10 वेळा विचार करेल', नवाज शरीफच्या मुलीची दर्पोक्ती.
या गोष्टीत धर्म, जात, पात भाषा आणायच्या नाहीत - शरद पवार
या गोष्टीत धर्म, जात, पात भाषा आणायच्या नाहीत - शरद पवार.
27 नागरिकांचे मृत्यू हे सरकारने घेतलेले नरबळी; संजय राऊतांचा घणाघात
27 नागरिकांचे मृत्यू हे सरकारने घेतलेले नरबळी; संजय राऊतांचा घणाघात.
मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल, पाकची तंतरली अन् मध्यरात्री मोठा दावा
मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल, पाकची तंतरली अन् मध्यरात्री मोठा दावा.
पहलगामनंतर CCSची बैठक, 'सिंधू जल' स्थगितीनंतर कोणता मोठा निर्णय होणार?
पहलगामनंतर CCSची बैठक, 'सिंधू जल' स्थगितीनंतर कोणता मोठा निर्णय होणार?.
पाकिस्तानची मस्ती काय उतरेना..भारतीय लष्कराबाबत समर्थकांकडून खोटे दावे
पाकिस्तानची मस्ती काय उतरेना..भारतीय लष्कराबाबत समर्थकांकडून खोटे दावे.
यूट्यूब चॅनल बंद केले; याला बदला म्हणायचं का? संजय राऊतांचा सवाल
यूट्यूब चॅनल बंद केले; याला बदला म्हणायचं का? संजय राऊतांचा सवाल.
पहलगाम हल्ल्याबाबत एनआयएच्या तपासात मोठी माहिती समोर
पहलगाम हल्ल्याबाबत एनआयएच्या तपासात मोठी माहिती समोर.
पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींच्या निर्णयाला RSSचा पाठिंबा - सूत्र
पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींच्या निर्णयाला RSSचा पाठिंबा - सूत्र.