CBSE 12th Result 2022 Updates : सीबीएसईचा निकाल जाहीर, पोरांनो असा बघा निकाल…
CBSE Board 12th Result 2022 date and time News in marathi : सीबीएसईचा निकाल जाहीर, निकाल कसा पाहावा याची सर्व माहिती...
मुंबई : सीबीएसईचा (CBSE) निकाल लागला आहे. सीबीएसई बारावीचा निकाल (CBSE 12th results 2022) जाहीर केला. विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर निकाल तपासू शकतात. नुकताच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी निकाल जाहीर होण्याबाबत सांगितलं होतं की, सीबीएसईचा निकाल जाहीर होण्यास कोणताही विलंब झालेला नाही. 2 बोर्डाची टर्म परीक्षा 15 जून रोजी संपली आणि त्यानंतर तपासणीचे काम सुरू झाले. ते पुढे म्हणाले की, सीबीएसईचा निकाल तपासण्यासाठी 45 दिवस लागतात, आज फक्त 30 दिवस झाले आहेत. निकाल यथावकाश जाहीर होतील. सीबीएसई परीक्षेला बसलेले उमेदवार आता त्यांच्या रोल नंबरच्या मदतीने त्यांचे स्कोअरकार्ड तपासू शकतात. पण हा निकाल कसा पाहायचा हे बघूयात…
निकाल कसा पाहावा?
सगळ्यात आधी तुमच्या फोनमध्ये Google सर्च इंजिनवर जा.
Digilocker वेबसाइट digilocker.gov.in वर जा किंवा Play Store मध्ये Digilocker अॅप डाउनलोड करा आणि उघडा.
साइन अप लिंकवर क्लिक करा.
तिथे तुमचे नाव, जन्मतारीख, श्रेणी, मोबाइल नंबर, ईमेल आयडी, आधार क्रमांक आणि 6 अंकी सुरक्षा पिन टाका.
सर्व आवश्यक माहिती भरल्यानंतर नाव सेट करा.
नाव तयार केल्यानंतर ‘CBSE वर्ग 12 निकाल 2022’ या लिंकवर क्लिक करा.
तुमचा रोल नंबर आणि नोंदणीकृत मोबाइल नंबर टाका. तुमचा निकाल स्क्रीनवर येईल.
निकाल पाहिल्यानंतर डाउनलोड करा आणि तुम्ही प्रिंट काढू शकताअखेर विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता बारावीचा निकाल जाहिर करण्यात आला आहे. यंदा देखील मुलींनीच बाजी मारली. बारावी सीबीएससी बोर्डाच्या परीक्षेमध्ये एकूण 94.54 टक्के मुली पास झाल्या आहेत. तर 91.25 टक्के मुलं उत्तीर्ण झाले आहेत. जवाहर नवोदय विद्यालयाचा निकाल 98.93 टक्के इतका लागला. तर 97.04 टक्के एवढा केंद्रीय विद्यालयाचा निकाल लागला आहे.यंदाच्या निकालामध्ये त्रिवेंद्रम अव्वल स्थानावर असून, इतर झोनच्या तुलनेत त्रिवेंद्रम झोनची टक्केवारी ही सर्वाधिक आहे. विद्यार्थी digilocker.gov.in या शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपला निकाल चेक करू शकतात.