CBSE Board 12th Result 2021: सीबीएसई बारावी निकालासाठी मूल्यांकन फॉर्म्युला उद्या जाहीर होणार
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आलेल्या सीबीएसई 12 वी परीक्षा 2021 च्या निकालाचा मूल्यांकन फॉर्म्युला उद्या जाहीर करण्यात येणार आहे. (CBSE Board 12th Result 2021 Evaluation Formula)
नवी दिल्ली : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आलेल्या सीबीएसई 12 वी परीक्षा 2021 (CBSE Board 12th Result 2021) च्या निकालाचा मूल्यांकन फॉर्म्युला उद्या जाहीर करण्यात येणार आहे. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द झालेल्या आहेत, परंतु मूल्यमापन करण्याची पद्धत काय असेल याबद्दल पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनात बरेच प्रश्न आहेत. या संदर्भात उद्या सीबीएसई अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. (CBSE Board 12th Result 2021 Evaluation Formula)
उद्या महत्त्वाची घोषणा
सीबीएसईच्या वतीने वस्तुनिष्ठ निकष ठरवण्यासाठी सीबीएसईने 12 सदस्यांची समिती गठीत केली होती. ही समिती उद्या आपला अहवाल सादर करेल. समिती उद्या हा अहवाल सादर करेल. ही बाब यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात गेली आहे, म्हणून उद्या आपण प्रथम सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र देऊ. यानंतर सीबीएसई निकाल जाहीर करेल, अशी माहिती सीबीएसई परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी दिली. तत्पूर्वी निकाल कोणत्या आधारावर जाहीर केला जाईल, या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीय.
28 जूनपर्यंत डेटा पाठवणं शाळांसाठी बंधनकारक
मूल्यांकन निकष ठरल्यानंतर निकालावर काम करणं सुरु होईल. 28 जूनपर्यंत हा डेटा शाळांना पाठवावा लागेल. सर्व डेटा आल्यानंतर सीबीएसई 15 जुलैपर्यंत निकाल जाहीर करू शकते. 12 वीचा मूल्यांकन फॉर्म्युला ठरविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि सीबीएसईला दोन आठवड्यांचा अवधी दिला होता.
अॅटर्नी जनरल केके वेणुगोपाल यांनी कोर्टाकडे चार आठवड्यांचा अवधी मागितला परंतु न्यायालयाने 14 दिवसांच्या आत मूल्यांकन धोरण ठरविण्यास सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 1 जून रोजी झालेल्या बैठकीत सीबीएसईची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
बऱ्याच राज्यांतही परीक्षा रद्द
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, राजस्थान, गोवा, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि तेलंगणात सीबीएसई आणि सीआयएससीईने आतापर्यंत १२ वीच्या बोर्ड परीक्षा रद्द केल्या आहेत. यामधल्या अनेक राज्यांमध्ये बारावीचा निकाल जाहीर करण्याची तयारी झाली आहे. त्याचबरोबर पंजाब बोर्ड देखील बारावीच्या परीक्षेसंदर्भातील निर्णय येण्याची शक्यता आहे. सीबीएसई नंतर इतर राज्येही निकालासंदर्भात निर्णय घेऊ शकतात.
(CBSE Board 12th Result 2021 Evaluation Formula)
हे ही वाचा :
MHT CET Exam: महाराष्ट्रात CET परीक्षा कधी? मंत्री उदय सामंतांनी दिली महत्त्वाची माहिती
UPSSSC Admit Card : ज्युनिअर असिस्टंट पदासाठीचं अॅडमिट कार्ड जारी, असं करा डाऊनलोड