CBSE Class 12 Result 2021 declared Live Updates : सीबीएसई 12 वीचा निकाल जाहीर, 99.37% विद्यार्थी पास

| Updated on: Jul 30, 2021 | 2:39 PM

CBSE Board 12th Result 2021 : सीबीएसईच्या बारावी 12 वी परीक्षेचा निकाल (CBSE 12th Result 2021)  जाहीर झाला आहे.  सीबीएसई बोर्डाची अधिकृत वेबसाईट cbseresults.nic.in यावर हा निकाल जाहीर झाला.

CBSE Class 12 Result 2021 declared Live Updates : सीबीएसई 12 वीचा निकाल जाहीर, 99.37% विद्यार्थी पास
CBSE result live

CBSE Class 12 Result 2021 Live Updates : सीबीएसईच्या बारावी 12 वी परीक्षेचा निकाल (CBSE 12th Result 2021)  जाहीर झाला आहे.  सीबीएसई बोर्डाची अधिकृत वेबसाईट cbseresults.nic.in यावर हा निकाल जाहीर झाला. यंदा 99.37  टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. बोर्डाने यापूर्वीच सांगितल्यप्रमाणे यंदाही मेरिट लिस्ट जाहीर होणार नाही.  सर्वोच्च न्यायालयाने सीबीएसई आणि इतर राज्य मंडळाला 31 जुलैपर्यंत बारावीचा निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. 25 जुलैपर्यंत निकाल अंतिम करण्याचे काम शाळांकडून पूर्ण केले. आता अखेर आज हा निकाल जाहीर झाला आहे.

बारावीचा निकाल cbse.nic.in, cbseacademic.nic.in आणि cbseresult.nic.in या वेबसाईटवर निकाल जाहीर केला जाणार आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 30 Jul 2021 02:29 PM (IST)

    CBSE Class 12 Result 2021 declared : सीबीएसई 12 वीचा निकाल 99.37  टक्के

    सीबीएसई बोर्डाची अधिकृत वेबसाईट cbseresults.nic.in यावर 12 वीचा  निकाल जाहीर झाला. यंदा 99.37  टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. बोर्डाने यापूर्वीच सांगितल्यप्रमाणे यंदाही मेरिट लिस्ट जाहीर होणार नाही.

  • 30 Jul 2021 02:08 PM (IST)

    CBSE Class 12 Result 2021 declared : सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर

    सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. बोर्डाची अधिकृत वेबसाईट cbseresults.nic.in यावर हा निकाल जाहीर झाला.  त्यामुळे विद्यार्थ्यांची ताणलेली उत्सुकता आता आनंदात बदलली आहे.

  • 30 Jul 2021 01:40 PM (IST)

    HSC result : महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल ऑगस्टमध्ये

    महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल ऑगस्टमध्ये

  • 30 Jul 2021 01:39 PM (IST)

    CBSE Result : थोड्याच वेळात वेबसाईटवर निकाल जाहीर होणार

    CBSE Result थोड्याच वेळात वेबसाईटवर निकाल जाहीर होणार, विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला. सीबीएसईची अधिकृत वेबसाईट cbseresults.nic.in यावर  निकाल जाहीर होणार. दुपारी दोन वाजता निकाल पाहता येणार

  • 30 Jul 2021 12:58 PM (IST)

    CBSE result via SMS : सीबीएसईचा निकाल एसएमएसने कसा मिळवाल?

    सीबीएसईने 12 वी परीक्षेचा निकाल बोर्डाची वेबसाईट cbseresults.nic.in वर जाहीर होत असल्याने, या वेबसाईटवर अतिरिक्त भार येण्याची शक्यता आहे. दुपारी दोन वाजता सर्व विद्यार्थी या वेबसाईटवर भेट देऊ शकतात. त्यामुळे ही वेबसाईट क्रॅश होऊ शकते. मात्र अशा परिस्थितीत मनस्ताप करुन न घेता, निकाल पाहण्यासाठी दुसरे पर्यायही तपासावे. विद्यार्थ्यांसाठी CBSE 12 वीचा निकाल SMS द्वारेही पाहता येऊ शकतो.

    SMS आणि IVRS

    विद्यार्थी SMS नेही आपला निकाल पाहू शकतात. मोबाईलवरुन <CBSE12>space<Roll Number>space<Admit Card ID> हा तपशील भरुन 7738299899 या नंबरवर SMS करा. निकाल जाहीर झाल्यानंतर यावर निकाल मिळू शकेल.

    याशिवाय IVRS द्वारेही निकाल ऐकायला मिळू शकतो. त्यासाठी 011-24300699 नंबरवर कॉल करा.

  • 30 Jul 2021 12:37 PM (IST)

    CBSE Result roll number find : रोल नंबर चेक करा

    सीबीएसई 12 वी परीक्षेचा निकाल जाहीर होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे. विद्यार्थ्यांना रोल नंबर चेक करण्यासाठीची लिंक ऑफिशिअल वेबसाईट cbse.gov.in वर अॅक्टिव्ह झाली आहे. या वेबसाईटवर जाऊन ‘Roll Number Finder’वर क्लिक करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा रोल नंबर दिसेल.

  • 30 Jul 2021 12:21 PM (IST)

    CBSE result live : बारावीचे निकाल कसे तयार झाले?

    बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन इयत्ता दहावी आणि अकरावीतील गुण आणि पूर्वपरीक्षा यांच्या आधारे करण्यात आले. 30 टक्के गुण दहावी बोर्ड परीक्षेच्या आधारे, 30 टक्के गुण अकरावीच्या गुणांच्या आधारे, तर उर्वरित 40 टक्के गुण बारावीतील घटक चाचणी, सत्र परीक्षा आणि प्री-बोर्ड अर्थात पूर्वपरीक्षा यांच्या आधारे देण्यात आले.

  • 30 Jul 2021 12:17 PM (IST)

    CBSE result website look : सीबीएसईनं वेबसाईटचा लूक बदलला

    सीबीएसईच्या बारावी 12 वी परीक्षेचा निकाल (CBSE 12th Result 2021) आज जाहीर होत आहे. त्यामुळे बोर्डाने वेबसाईटचा लूक बदलला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान हे सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या निकालासंदर्भात घोषणा करणार होते. त्यानुसार आज निकाल जाहीर होत आहे. तर, सीबीएसई यंदा देखील निकाल जाहीर झाल्यांनतर गुणवत्ता यादी जाहीर करणार नाही.

  • 30 Jul 2021 12:07 PM (IST)

    CBSE 12th Result website: सीबीएसई निकाल कुठे आणि कसा पाहाल?

    CBSE 12th Result 2021 असे तपासा

    खाली दिलेल्या सोप्या स्टेप्सने विद्यार्थी त्यांचे निकाल तपासू शकतील.

    – निकाल तपासण्यासाठी प्रथम सीबीएसईची अधिकृत वेबसाईट cbse.gov.in वर जावे लागेल. – त्यानंतर वेबसाईटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा. – आता विनंती क्रमांक जसे रोल नंबर इत्यादी सबमिट करावी लागेल. – आपला निकाल स्क्रीनवर दिसून येईल. – आता हे तपासा. (Important notice from CBSE regarding 12th result)

  • 30 Jul 2021 12:04 PM (IST)

    CBSE 12th Result live : सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने बोर्डाची पावलं

    सर्वोच्च न्यायालयाने सीबीएसई आणि इतर राज्य मंडळाला 31 जुलैपर्यंत बारावीचा निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. 25 जुलैपर्यंत निकाल अंतिम करण्याचे काम शाळांकडून पूर्ण केले. त्यानुसार 25 ते 31 जुलै दरम्यान निकाल जाहीर होणे अपेक्षित होतं. त्यानुसार आज म्हणजे 30 जुलैला निकाल जाहीर होत आहे.

Published On - Jul 30,2021 12:02 PM

Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.