CBSE 10th Result 2021 Declared LIVE Updates: सीबीएसईच्या दहावीच्या निकालात त्रिवेंद्रमची बाजी, पुणे विभाग कितव्या स्थानी?
CBSE 10th Result 2021 LIVE Updates: सीबीएसईकडून दहावीचा निकाल आज जाहीर केला जाणार आहे. दहावीचे विद्यार्थी cbseresult.nic.in या वेबसाईटवर निकाल पाहू शकतात.
नवी दिल्ली: सीबीएसईच्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाची प्रतीक्षा संपली आहे. सीबीएसईकडून दहावीचा निकाल आज जाहीर केला आहे. दहावीचे विद्यार्थी cbseresult.nic.in या वेबसाईटवर निकाल पाहू शकतात. शुक्रवारी सीबीएसईकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
सीबीएसईचा निकाल कुठे पाहयचा ?
https://testservices.nic.in/class10/class10th21.htm
https://josaa.nic.in/class10/class10th21.htm
https://cbseresults.nic.in/class10/Class10th21.htm
दहावीचा निकाल कसा तयार करण्यात आला?
निकालासाठी 20 + 80 चे सूत्र तयार केले गेले आहे. प्रत्येक विषयात जास्तीत जास्त 100 गुणांचे मूल्यांकन केले जाईल, त्यापैकी 20 गुण पूर्वीच्या आतील मूल्यांकन असतील. याशिवाय उर्वरित 80 गुण नव्या पॉलिसीच्या आधारे दिले जातील. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी या 80 गुणांची तीन भागात विभागणी करण्यात आली आहे. यापैकी 10 गुण वेळोवेळी घेण्यात आलेले युनिट परीक्षेचे आहेत, 30 मध्यावधी परीक्षेसाठी आणि 20 प्रीबोर्ड परीक्षेसाठी आहेत.
LIVE NEWS & UPDATES
-
हॉकी- कांस्य पदकासाठी भारत-जर्मनी आमने-सामने
पुरुष हॉकी स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने जर्मनीला 3-1 नमवत फायनलमध्ये जागा मिळवली आहे. त्यामुळे कांस्य पदकासाठी भारत आणि जर्मनी यांच्यात सामना असेल. गुरुवारी 5 ऑगस्टला हा सामना खेळवला जाईल.
-
सीबीएसईचा दहावीचा निकाल 99.04 टक्के, त्रिवेंद्रमनं मारली बाजी, पुणे कितव्या स्थानावर?
सीबीएसईच्या दहावी परीक्षेसाठी 21,13,767 विद्यार्थ्यांनी 10 वीच्या नोंदणी केली होती. यापैकी 20,97,128 विद्यार्थ्यांसाठी निकाल तयार करण्यात आला आहे. त्याचबरोबर 16,639 विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 20 लाख 76 हजार997 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दहावीच्या परीक्षेत एकूण 99.04 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्रिवेंद्रम शहरानं सीबीएसईच्या निकालात बाजी मारली आहे.
-
-
सीबीएसईचा दहावीचा निकाल 99.4 टक्के
सीबीएसईच्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाची प्रतीक्षा संपली आहे. सीबीएसईकडून दहावीचा निकाल आज जाहीर केला आहे. दहावीचे विद्यार्थी cbseresult.nic.in या वेबसाईटवर निकाल पाहू शकतात. दहावीचा निकाल 99.4 टक्के लागला आहे.
-
CBSE 10th Result 2021Declared: सीबीएसईचा दहावीचा निकाल जाहीर
CBSE 10th Result 2021Declared: सीबीएसईकडून पर्यायी मूल्यांकन धोरणाच्या आधारे दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थी सीबीएसईच्या वेबसाईटवर आणि डिजीलॉकरद्वारे निकाल पाहू शकतात.
-
सीबीएसईचे दहावीचे रोल नंबर कुठे पाहायचे?
सीबीएसईचे दहावीचे रोल नंबर कुठे पाहायचे?
Dear Students Results can be accessed on https://t.co/JfDBA2YU8F or https://t.co/9z38Le7QWU or DigiLocker
Find your Roll Number using the Finder on https://t.co/1RMसीO8azHpP #CBSEResults #CBSE pic.twitter.com/vxdP1NFcLJ
— CBSE HQ (@cbseindia29) August 3, 2021
-
-
यंदाही गुणवत्ता यादी जाहीर होणार नाही
वेगळ्या गुणांकन योजनेच्या आधारे निकाल तयार होत असल्याने यावर्षी सीबीएसई गुणवत्ता यादी जाहीर न करण्याची शक्यता आहे. कोणताही निर्णय असो, निकाल लागल्यावर बोर्ड त्यास पुष्टी देईल.
-
दहावीचा निकाल कसा तयार करण्यात आलाय?
निकालासाठी 20 + 80 चे सूत्र तयार केले गेले आहे. प्रत्येक विषयात जास्तीत जास्त 100 गुणांचे मूल्यांकन केले जाईल, त्यापैकी 20 गुण पूर्वीच्या आतील मूल्यांकन असतील. याशिवाय उर्वरित 80 गुण नव्या पॉलिसीच्या आधारे दिले जातील. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी या 80 गुणांची तीन भागात विभागणी करण्यात आली आहे. यापैकी 10 गुण वेळोवेळी घेण्यात आलेले युनिट परीक्षेचे आहेत, 30 मध्यावधी परीक्षेसाठी आणि 20 प्रीबोर्ड परीक्षेसाठी आहेत.
-
CBSE 10th Result 2021: दहावीचा निकाल कुठे पाहायचा?
सीबीएसईचा निकाल cbse.gov.in आणि cbseresults.nic.in या वेबसाईटवर निकाल पाहता येईल. दहावीच्या निकालानंतर या लिंकवर निकाल उपलब्ध होणार आहे.
स्टेप 1 : सर्व प्रथम, सीबीएसई अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in वर जा.
स्टेप 2 : वेबसाईटवर दिलेल्या सीबीएसई 10 वीच्या निकालाच्या 2021 च्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3 : त्यानंतर, आपल्याला आपला रोल नंबर आणि जन्मतारीख सबमिट करावी लागेल.
स्टेप 4 : आपला निकाल स्क्रीनवर दिसून येईल.
स्टेप 5 : आता आपण आपला निकाल तपासण्यास सक्षम असाल.
-
सीबीएसईचा दहावीचा निकाल आज दुपारी 12 वाजता जाहीर होणार
सीबीएसईचा दहावीचा निकाल आज दुपारी 12 वाजता जाहीर होणार
CBSE Class X Results to be announced today at 12 Noon.#CBSEResults #CBSE pic.twitter.com/LJU1MUaB4Z
— CBSE HQ (@cbseindia29) August 3, 2021
Published On - Aug 03,2021 10:51 AM