CBSE Result 2021: सीबीएसई बारावीच्या कंपार्टमेंट परीक्षेचा निकाल जाहीर, रिझल्ट कुठं पाहायचा?

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईनं 12 वीच्या विशेष परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईट cbseresults.nic.in. Cbse.gov.in वर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल.

CBSE Result 2021: सीबीएसई बारावीच्या कंपार्टमेंट परीक्षेचा निकाल जाहीर, रिझल्ट कुठं पाहायचा?
CBSE
Follow us
| Updated on: Sep 29, 2021 | 5:17 PM

नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईनं 12 वीच्या विशेष परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. विशेष मूल्यांकन सूत्रानुसार जाहीर करण्यात आलेल्या निकालावर समाधानी नसलेल्या, खासगी आणि श्रेणी सुधारणा करण्यासाठी बोर्डाने घेतलेल्या ऑफलाइन विशेष परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईट cbseresults.nic.in. Cbse.gov.in वर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल.

30 सप्टेंबरपर्यंत निकाल जाहीर करण्याची डेडलाईन

12 वीच्या कंपार्टमेंट परीक्षेचा निकाल 30 सप्टेंबरपूर्वी निकाल जाहीर करण्याची शक्यता होती. सीबीएसईनं आजचं बारावीचा निकाल जाहीर केला आहे. सीबीएसई बोर्डाने सुप्रीम कोर्टात बारावीच्या कंपार्टमेंट आणि विशेष परीक्षेचा निकाल 30 सप्टेंबरपर्यंत जाहीर करणार असल्याचं सांगितलं होतं.

CBSE 12th Compartment Result 2021 मार्कशीट कसं डाऊनलोड करायचं?

स्‍टेप 1: सीबीएसईची वेबसाईट cbseresults.nic.in ला भेट द्या. स्‍टेप 2: लेटेस्‍ट अपडेट सेक्‍शन वर क्लिक करा तिथे रिझल्ट लिंक वर क्लिक करा. स्‍टेप 3: आता डाऊनलोड रिझल्‍ट लिंक पर क्लिक करा. स्‍टेप 4: लॉगिन पेजवर रोल नंबर आणि जन्मतारीख नोंदवा. स्‍टेप 5: यानंतर निकाल उपलब्ध होईल, तो डाऊनलोड करा.

CBSE 12 वी निकाल पाहण्याचे आणखी पर्याय

CBSE 12 वी निकाल पाहण्यासाठी अनेक आहेत. यामध्ये डिजीलॉकर, SMS, ई मेल, उमंग मोबाईल अॅप, आयव्हीआरएस याद्वारे निकाल पाहू शकता.

Digi locker

डिजीलॉकर एक ऑनलाईन क्लाऊड सॉफ्टवेअर आहे. यामध्ये आपण निकाल चेक करुन मार्कशीटही डाऊनलोड करु शकता. त्यासाठी तुम्हाला डिजीलॉकर वेबसाईटवर जाऊन ‘View result’ वर क्लिक करा. तिथे तुमचा रोल नंबर टाका, क्लास निवडा आणि अॅडमिट कार्ड टाका. त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा. विद्यार्थ्यांना निकाल डाऊनलोड करुन प्रिंटही काढता येऊ शकेल.

SMS आणि IVRS

विद्यार्थी SMS नेही आपला निकाल पाहू शकतात. मोबाईलवरुन spacespace हा तपशील भरुन 7738299899 या नंबरवर SMS करा. निकाल जाहीर झाल्यानंतर यावर निकाल मिळू शकेल. याशिवाय IVRS द्वारेही निकाल ऐकायला मिळू शकतो. त्यासाठी 011-24300699 नंबरवर कॉल करा.

जेईई ॲडव्हान्सड परीक्षेचं प्रवेशपत्र जाहीर

संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) प्रगत 2021 साठी प्रवेशपत्र जारी करण्यात आलं आहे. जेईई प्रगत परीक्षेचे प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर अपलोड करण्यात आलं आहे. ज्या उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज केले आहेत ते फक्त या संकेतस्थळावरून त्यांचे प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतील. परीक्षेचे हे प्रवेशपत्र (IIT JEE Admit Card 2021) परीक्षेच्या दिवशी 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत डाऊनलोड करता येईल. ही परीक्षा भारतीय तंत्रज्ञान संस्थांमध्ये (IITs) अभियांत्रिकी आणि आर्किटेक्चर आणि नियोजन कार्यक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी घेतली जाईल. आम्ही तुम्हाला सांगू की फक्त तेच विद्यार्थी IIT JEE परीक्षेत भाग घेतात ज्यांची रँक JEE Main मध्ये 2.5 लाखांच्या आत येते.

 इतर बातम्या:

NEET: पुन्हा परीक्षा घ्या…! नीट यूजी परीक्षेतील गैरप्रकारामुळं संतप्त विद्यार्थी सुप्रीम कोर्टात

CBSE Result 2021 Date: सीबीएसई बारावीच्या विशेष परीक्षेच्या रिझल्टची तारीख जाहीर, निकाल कुठे पाहणार?

CBSE Class 12 Private candidates Special compartment Exam result declared check at cbseresult nic in

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.