AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुस्तके समोर ठेऊन लिहा दहावी- बारावीचा पेपर, आता ‘ओपन बुक टेस्ट’

CBSE Open Book Exam | सीबीएसई शाळेत 9 आणि 10 साठी इंग्रजी, गणित आणि विज्ञान विषयासाठी ही परीक्षा होणार आहे. 11 आणि 12 साठी इंग्रजी, गणित आणि जीवशास्त्र या विषयांसाठी ओपन-बुक टेस्ट होणार आहे. हा पायलट प्रोजेक्ट असून तो यशस्वी ठरला तर सर्वच शाळांमध्ये तो लागू करण्यात येणार आहे.

पुस्तके समोर ठेऊन लिहा दहावी- बारावीचा पेपर, आता 'ओपन बुक टेस्ट'
Follow us
| Updated on: Feb 23, 2024 | 9:17 AM

नवी दिल्ली, दि. 23 फेब्रुवारी 2024 | दहावी, बारावीच्या परीक्षा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे सध्या विद्यार्थी अभ्यासाला लागले आहेत. त्यातच आता ‘ओपन बुक टेस्ट’ची बातमी आली आहे. यामध्ये पुस्तके, नोट्स हवे अभ्यासाचे साहित्य जवळ ठेऊन पेपर लिहिता येणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातंर्गत (NEP) भारतातील शिक्षण प्रणालीत बदल करण्यात येणार आहे. यामुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाने (CBSE) 9 ते 12 पर्यंत ओपन बुक एग्जाम आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला आहे. हा पायलेट प्रोजेक्ट लवकरच लागू करण्यात येणार आहे.

सीबीएसई बोर्डने यावर्षाच्या शेवटी काही मोजक्या शाळेत ओपन बुक टेस्ट सुरु करण्याची योजना तयार केली आहे. नोव्हेंबर महिन्यात नवीन ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकणार आहे. यावेळी विद्यार्थी परीक्षा देताना पुस्तके, नोट्स किंवा अन्य मान्य केलेल्या अभ्यास सामग्री समोर ठेऊन परीक्षा देऊ शकणार आहे.

काय ओपन बुक एग्जाम?

ओपन बुक परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या नोट्स, इतर वाचन आणि अभ्यास सामग्रीचा संदर्भ देऊन परीक्षा देता येणार आहे. म्हणजेच परीक्षेला बसलेले विद्यार्थी पुस्तके आणि नोट्समधून उत्तरे शोधून लिहू शकणार आहे. ओपन बुक परीक्षा दोन प्रकारे घेतली जाते. पहिली म्हणजे विद्यार्थी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये बसून परीक्षा देतात. त्यांना पेपर आणि उत्तरपत्रिका दिली जाते. परीक्षा देताना विद्यार्थी त्यांच्या पाठ्यपुस्तक आणि इतर मान्यताप्राप्त साहित्याची मदत घेऊ शकतात. ओपन बुक परीक्षेचा दुसरा प्रकार ऑनलाईन आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन पेपर सेट पाठवण्यात येतात. त्यानंतर विद्यार्थी विद्यापीठाच्या विशेष पोर्टलवर जाऊन लागीन करुन परीक्षा देऊ शकतात. त्यावेळी सर्व अभ्यास सामग्री विद्यार्थी वापरु शकतात. वेळ पूर्ण झाल्यावर पोर्टवरुन लॉगआऊट करता येते.

हे सुद्धा वाचा

काय होणार ओपन बुक परीक्षेचा फायदा

ओपन बुक परीक्षा पद्धतीमुळे रट्टा मारण्याची सवय जाणार आहे. विद्यार्थ्यांना विचार करुन उत्तर लिहावी लागणार आहे. त्यामुळे त्यांचे कौशल्य विकसित होईल. विद्यार्थ्यांना एनालिसिस, क्रिटकल आणि क्रिएटिव्ह विचाराची सवय होईल. समस्येच्या मूल्यांकन करुन लक्ष केंद्रीत करता येणार आहे.

कोणत्या विषयांसाठी परीक्षा

सीबीएसई शाळेत 9 आणि 10 साठी इंग्रजी, गणित आणि विज्ञान विषयासाठी ही परीक्षा होणार आहे. 11 आणि 12 साठी इंग्रजी, गणित आणि जीवशास्त्र या विषयांसाठी ओपन-बुक टेस्ट होणार आहे. हा पायलट प्रोजेक्ट असून तो यशस्वी ठरला तर सर्वच शाळांमध्ये तो लागू करण्यात येणार आहे.

हे ही वाचा

दहावीला करावा लागणार दहा विषयांचा अभ्यास तर बारावीला…काय आहे नवीन प्रस्ताव

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.