CBSE Admit Card 2021: सीबीएसई दहावी बारावीच्या टर्म 1 परीक्षेचं प्रवेशपत्र जाहीर करण्याची शक्यता

केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीनं दहावी आणि बारावीच्या प्रथम सत्र परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र सीबीएसईच्या cbse.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध होईल.

CBSE Admit Card 2021: सीबीएसई दहावी बारावीच्या टर्म 1 परीक्षेचं प्रवेशपत्र जाहीर करण्याची शक्यता
CBSE
Follow us
| Updated on: Nov 09, 2021 | 11:26 AM

नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीनं दहावी आणि बारावीच्या प्रथम सत्र परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र सीबीएसईच्या cbse.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध होईल. नवीन शिक्षण धोरणानुसार यंदा प्रथमचं सीबीएसईकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षा दोन सत्रात घेण्यात येत आहेत.

प्रवेशपत्र कुठं मिळणार?

केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळाशी संलग्न असलेल्या शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीचं प्रवेशपत्र उलपब्ध होईल. तर, खासगी विद्यार्थ्यांना सीबीएसईच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र उपलब्ध होईल.

प्रवेशपत्र कसे डाऊनलोड करावे?

स्टेप 1 : प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. स्टेप 2 : वेबसाईटच्या होम पेजवरील, 10वी, 12वी परीक्षेसाठी प्रवेशपत्र डाऊनलोड करा या लिंकवर क्लिक करा. स्टेप 3: नोंदणी क्रमांक/रोल क्रमांक/जन्मतारीख सबमिट करा स्टेप 4 : आता हॉल तिकीट स्क्रीनवर दिसेल. स्टेप 5 : हॉल तिकीट डाऊनलोड करा. प्रिंट आऊट काढा.

सीबीएसई मायनर परीक्षेला 16 नोव्हेंबरपासून सुरुवात

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार सीबीएसईनं दहावी बारावीच्या परीक्षा दोन सत्रात आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सीबीएसईकडून दहावी बारावीच्या टर्म 1 च्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं होतं. इयत्ता 10 वीची टर्म I मायनर विषय परीक्षा 17 नोव्हेंबर रोजी पेंटिंग पेपरसह सुरू होईल आणि 7 डिसेंबर रोजी अरबी, तिबेटी, फ्रेंच, जर्मन, रशियन, फारसी, नेपाळी, लिंबू, लेपचा आणि कर्नाटकी संगीताच्या पेपरसह समाप्त होईल. त्याचप्रमाणे, इयत्ता 12 वी टर्म I मायनर विषय परीक्षा 16 नोव्हेंबर रोजी उद्योजकता आणि सौंदर्य आणि निरोगीपणाच्या पेपरसह सुरू होईल आणि 30 डिसेंबर रोजी कृषी आणि मास मीडिया स्टडीजसह समाप्त होईल.

विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्याची संधी देईल

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने टर्म 1 परीक्षेची डेटशीट नुकतीच जारी केली आहे. आता सीबीएसईने विद्यार्थ्यांना नोटीसद्वारे परीक्षा केंद्र बदलण्याची परवानगी देण्यात आल्याचं सांगितलं आहे. बोर्डाच्या निदर्शनास आल्यानुसार अनेक विद्यार्थी त्यांची शाळा आहे त्या ठिकाणी नाहीत, अशा स्थितीत परीक्षेचे शहर बदलण्याची सुविधा विद्यार्थ्यांना दिली जाईल. सीबीएसईनं विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेशी कधी संपर्क साधू शकतात आणि परीक्षा केंद्र बदलण्याची विनंती करू शकतात यांसदर्भात सविस्तर माहिती देणार आहे.

इतर बातम्या:

CBSE Date Sheet 2021: सीबीएसईकडून मायनर विषयांची डेटशीट जाहीर, दहावी बारावीच्या टर्म 1 परीक्षेची घोषणा

पुण्याच्या जिल्हा परिषद शाळेची भरारी, रोबोटिक्स शिक्षणातून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे

CBSE Term 1 Admit card 2021 may be released today at cbse gov in

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.