11th admission process 2024: अकरावी प्रवेशासाठी अशी करा पूर्ण प्रक्रिया, या तारखा लक्षात ठेवा

11th admission process 2024: संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर लॉग इन आयडी व पासवर्ड मिळणार आहे. त्यानंतर वैयक्तिक माहिती असणारा अर्जाचा भाग १ भरावा. त्यानंतर माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाकडून अर्ज प्रमाणित करून घ्यावा लागणार आहे.

11th admission process 2024: अकरावी प्रवेशासाठी अशी करा पूर्ण प्रक्रिया, या तारखा लक्षात ठेवा
students
Follow us
| Updated on: Jun 02, 2024 | 8:55 AM

11th admission process 2024: राज्यात दहावीचा निकाल लागल्यानंतर अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली. राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका या भागासाठी केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया होणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आता ५ जूनपासून रविवारी १६ जूनपर्यंत महाविद्यालयाचा पसंती क्रमांक भरता येणार आहे. २६ जून रोजी सकाळी दहा वाजता अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. त्यानंतर २६ ते २९ जून दरम्यान महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. सध्या पहिल्याच प्रवेशफेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक

  • ५ ते १६ जून – प्रवेशासाठी पसंतिक्रम नोंदविणे, अर्जाचा दुसरा भाग ऑनलाइन सादर करणे, अर्ज लॉक करणे, अल्पसंख्याक, इनहाउस कोट्यासाठी ऑनलाइन पसंती नोंदविणे.
  • १५ जून – अर्जाचा भाग १ सायंकाळी ४ पर्यंत भरता येईल.
  • १८ ते २१ जून – भाग २ भरलेल्या व पडताळणी झालेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर करणे व भाग २ लॉक करणे. गुणवत्ता यादीत दुरुस्ती करण्यास त्यावर हरकती नोंदविणे. त्याचे संबंधित उपसंचालकांकडून निराकरण करणे.
  • २२ ते २५ जून – प्रवेशासाठी जागांची निवडयादी वेबसाइटवर जाहीर करणे. फेरीचा कटऑफ जाहीर करणे.
  • २६ ते २९ जून – संबंधित जागेवर प्रवेश निश्चित कऱणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे. यावेळी कॉलेज लॉगिनमध्ये प्रवेश निश्चित करणे, रद्द करणे, प्रवेश नाकारणे या प्रक्रिया सुरू राहतील.
  • २९ जून – प्रवेशित विद्यार्थ्यांची माहिती पोर्टलवर नोंदविणे.
  • १ जुलै – दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा जाहीर करणे.

पुढील प्रवेश फेऱ्यांच्या संभाव्य तारखा

  • दुसरी फेरी – २ ते ८ जुलै
  • तिसरी फेरी – ९ ते १८ जुलै
  • विशेष फेरी – १९ ते २६ जुलै

२०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी मुंबई महानगरक्षेत्रातील १ लाख ३३ हजार २९२ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्जाचा पहिला भाग भरला आहे. त्यातीतल ७९ हजार ४८१ विद्यार्थ्यांचे अर्ज लॉक केले आहेत. पुणे, पिंपरी चिंचवडासाठी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहे.

हे सुद्धा वाचा

ऑनलाइन अर्ज असा भरा?

विद्यार्थ्यांना https://11thadmission.org.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन नोंदणी भरता येणार आहे. त्यासाठी आपले शहर निवडावे लागणार आहे. या संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर लॉग इन आयडी व पासवर्ड मिळणार आहे. त्यानंतर वैयक्तिक माहिती असणारा अर्जाचा भाग १ भरावा. त्यानंतर माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाकडून अर्ज प्रमाणित करून घ्यावा लागणार आहे. महाविद्यालय पसंतीक्रम असणारा अर्जाचा दुसरा भाग ५ जूनपासून सुरु होत आहे. अर्जाचा भाग २ भरून किमान १ व कमाल १० महाविद्यालये ऑनलाइन पद्धतीने निवडावी लागणार आहे.

Non Stop LIVE Update
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.