CUET 2022 Exam Date: NTAकडून CUET UG परीक्षांची तारीख जाहीर! करेक्शन विंडो खुली, उद्यापर्यंत करता येणार अर्जात सुधारणा…

विद्यार्थी आजपासून म्हणजेच 23 जून 2022 ते उद्या 24 जून 2022 पर्यंत आपल्या अर्जात सुधारणा करू शकतात.

CUET 2022 Exam Date: NTAकडून CUET UG परीक्षांची तारीख जाहीर! करेक्शन विंडो खुली, उद्यापर्यंत करता येणार अर्जात सुधारणा...
NTAकडून CUET UG परीक्षांची तारीख जाहीर! Image Credit source: Official Website
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 3:16 PM

नवी दिल्ली: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (National Tesing Agency) सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षेच्या (CUET UG 2022) तारखा जाहीर केल्या आहेत. एनटीएने जारी केलेल्या नोटिसीनुसार, 15, 16, 19 आणि 20 जुलै आणि 4 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट दरम्यान सीयूईटी होणार आहे. सविस्तर वेळापत्रक पाहण्यासाठी विद्यार्थी cuet.samarth.ac.in cuet.samarth.ac.in या अधिकृत वेबसाइटला (Official Website) भेट देऊ शकतात. भारतातील 554 शहरांमध्ये आणि परदेशातील 13 शहरांमध्ये क्युईटीचे आयोजन करण्यात येणार आहे. एनटीएच्या वतीने सीयूईटीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही करेक्शन विंडो उघडण्यात आली आहे. विद्यार्थी आजपासून म्हणजेच 23 जून 2022 ते उद्या 24 जून 2022 पर्यंत आपल्या अर्जात सुधारणा करू शकतात.

विद्यार्थ्यांना पोर्टल तपासण्याची विनंती

केंद्रीय विद्यालयात प्रवेशासाठी ही एकमेव परीक्षा असल्याचे सांगत एनटीएने अधिसूचना जारी केली आहे. परीक्षेशी संबंधित अपडेट्ससाठी विद्यार्थ्यांना सतत cuet.samarth.ac.in पोर्टल तपासण्याची विनंती केली जाते. या परीक्षेसाठी आतापर्यंत 9,50,804 विद्यार्थ्यांनी अर्ज केल्याचेही एनटीएने म्हटले आहे. त्यापैकी 83 विद्यार्थी विद्यापीठाचे आहेत. त्यापैकी 43 केंद्रीय विद्यापीठाचे तर 13 राज्य विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत. 17 जुलैला नीट यूजी परीक्षा घेतली जाणार असल्याने त्या दिवशी CUET होणार नाही. याशिवाय या तारखांना जेईई मेन परीक्षा असल्याने 21 जुलै ते 3 ऑगस्ट 2022 या कालावधीत क्यूट घेण्यात येणार नाही.

डीम्ड विद्यापीठेही सीयूईटीद्वारे देणार प्रवेश

सीयूईटीच्या माध्यमातून देशभरातील केंद्रीय विद्यापीठांमध्ये ग्रॅज्युएशन म्हणजेच यूजी अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जाणार आहे. त्याचबरोबर काही डीम्ड विद्यापीठेही त्याद्वारे प्रवेश देतील. विशेष म्हणजे यावेळी दिल्ली विद्यापीठ, जेएनयू आणि बीएचयूसह अलाहाबाद विद्यापीठात सीयूईटीच्या माध्यमातून प्रवेश देण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

13 भाषांमध्ये घेतली जाईल CUET UG

CUET UG चा परीक्षा पॅटर्न आधीच प्रसिद्ध झाला आहे. परीक्षा पद्धतीनुसार, परीक्षा 13 भाषांमध्ये घेतली जाईल. CUET PG साठी अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण हाच पॅटर्न पीजीसाठी वापरला जाईल, अशी अट आहे. मात्र यासाठी अधिकृत घोषणा होणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.