CUET PG Admit Card: सीयूईटी-पीजी ॲडमिट कार्ड जारी! कसं डाऊनलोड करणार? cuet.nta.nic.in अधिकृत वेबसाइट
देशभरातील विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीयूईटी पीजी प्रवेश परीक्षा घेण्यात येत आहेत. सीयूईटी पीजी परीक्षेच्या स्कोअरच्या आधारे प्रवेश मिळणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) वतीने एनटीए ही परीक्षा घेत आहे.
सीयूईटी-पीजी परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सीयूईटी ॲडमिट कार्ड जारी करण्यात आलंय. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (National Testing Agency) कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट-पोस्टग्रॅज्युएट (CUET-PG) 2022 प्रवेशपत्र जारी केले आहे. ॲडमिट कार्ड जारी झाल्यानंतर उमेदवार cuet.nta.nic.in अधिकृत वेबसाइटवर जाऊन ते डाऊनलोड करू शकतात. ज्या उमेदवारांनी सीयूईटी पीजीसाठी नोंदणी केली आहे त्यांना प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख आवश्यक असेल. त्याशिवाय ॲडमिट कार्ड (Admit Card) डाऊनलोड करता येत नाही. यंदा सीयूईटी पीजी परीक्षा 1 ते 11 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे.
दोन शिफ्टमध्ये प्रवेश परीक्षा
सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत शिफ्ट आणि दुपारी 3 ते 5 या वेळेत शिफ्ट अशा दोन शिफ्टमध्ये प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहेत. 1, 2 आणि 3 सप्टेंबर रोजी होणाऱ्या प्रवेश परीक्षेसाठी सीयूईटी पीजी प्रवेशपत्रे घेण्यात आली आहेत. उर्वरित तारखांचे प्रवेशपत्र पुढे जारी केले जाईल. देशभरातील विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीयूईटी पीजी प्रवेश परीक्षा घेण्यात येत आहेत. सीयूईटी पीजी परीक्षेच्या स्कोअरच्या आधारे प्रवेश मिळणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) वतीने एनटीए ही परीक्षा घेत आहे.
सीयूईटी पीजी ॲडमिट कार्ड कसे डाउनलोड करावे?
- सीयूईटी पीजी ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी, cuet.nta.nic.in अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- होमपेजवर, ताज्या बातम्या विभागातील सीयूईटी (पीजी) 2022 च्या फेज 1 च्या ॲडमिट कार्ड क्लिक करा.
- आता ॲडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठीचं पेज दिसेल.
- इथे तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख भरा.
- सिक्युरिटी पिन भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
- आता तुम्हाला तुमचं ॲडमिट कार्ड पाहता येणार आहे. डाउनलोड करा.
परीक्षा सिटी स्लिप डाउनलोड करण्यासाठी…
एनटीएने सीयूईटी पीजी 2022 परीक्षा शहर/आगाऊ माहिती स्लिप जारी केली. परीक्षा सिटी स्लिप अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड केली जाऊ शकते. परीक्षा सिटी स्लिप डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख देखील आवश्यक असेल. सीयूईटी पीजी परीक्षा दोन तासांची असेल. यामध्ये उमेदवारांना 100 प्रश्न विचारले जाणार आहेत. एनटीएने सांगितले की, परीक्षा सिटी स्लिप जाहीर झाल्यानंतर उमेदवारांना योग्य वेळी परीक्षा केंद्रावर पोहोचता येईल. सीयूईटी पीजी प्रवेश पत्र 2022 थेट लिंक