CUET Phase 5: सीयूईटी फेज 5 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी!
यंदा देशातील केंद्रीय विद्यापीठांसह अनेक विद्यापीठांमधील पदवी अभ्यासक्रमांना सीयुईटी स्कोअरच्या माध्यमातून प्रवेश देण्यात येणार आहेत. त्यासाठी एनटीएकडून देशभरातील विविध शहरांमध्ये सीयूईटी परीक्षा घेण्यात येत आहेत.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (National Testing Agency) कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्टच्या (CUET) फेज 5 परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर केले आहे. ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली आहे ते आता cuet.samarth.ac.in अधिकृत वेबसाइटवर जाऊन त्यांचे सीयूईटी यूजी फेज 5 प्रवेशपत्र ऑनलाइन डाउनलोड करू शकतात. 5 व्या टप्प्यातील परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्याच्या स्टेप्स आणि अधिकृत लिंक खाली बातम्यांमध्ये दिलेल्या आहेत. सीयूईटी फेज 5 च्या परीक्षेत 2.01 लाख विद्यार्थी सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. एनटीएने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, सीयूईटी यूजी फेज 5 परीक्षा 21 ऑगस्टपासून सुरू होणार आहे, जी 23 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. प्रवेशपत्र डाउनलोड (Admit Card Download) करण्यासाठी उमेदवारांना त्यांचे लॉगिन क्रेडेन्शियल्स वापरावे लागतील. यंदा देशातील केंद्रीय विद्यापीठांसह अनेक विद्यापीठांमधील पदवी अभ्यासक्रमांना सीयुईटी स्कोअरच्या माध्यमातून प्रवेश देण्यात येणार आहेत. त्यासाठी एनटीएकडून देशभरातील विविध शहरांमध्ये सीयूईटी परीक्षा घेण्यात येत आहेत.
सीयूईटी प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे?
- सीयूईटी प्रवेशपत्र 2022 डाउनलोड करण्यासाठी, cuet.samarth.ac.in अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- होमपेजवर डाऊनलोड ॲडमिट कार्ड लिंकवर क्लिक करा.
- आता तुम्हाला होमपेजवर लॉगइन करावं लागेल.
- आता तुम्हाला तुमचे सीयूईटी यूजी 2022 फेज 5 ॲडमिट कार्ड स्क्रीनवर पाहता येणार आहे.
- ॲडमिट कार्ड डाऊनलोड करा आणि पुढील वापरासाठी त्याची प्रिंट आऊट घ्या.
उमेदवार आपली तक्रार पाठवू शकतात
उमेदवारांना असे सांगण्यात आले आहे की त्यांना केवळ सीयूईटी फेज 5 प्रवेशपत्र घेऊन परीक्षा हॉलमध्ये जावे लागेल. या कागदपत्राशिवाय विद्यार्थ्यांना परीक्षेत सहभागी होता येणार नाही. त्याचबरोबर आतापर्यंत सीयूईटी परीक्षेदरम्यान अनेक समस्या दिसून आल्या आहेत. यासंदर्भात सीयूईटी यूजी फेज 5 प्रवेशपत्रासंदर्भात जारी करण्यात आलेल्या अधिकृत नोटीसमध्ये म्हटले आहे की, “विषय संयोजन, माध्यम, प्रश्नपत्रिका यासारख्या समस्यांसाठी उमेदवार आपली तक्रार cuetgrievance@nta.ac.in पाठवू शकतात. उमेदवारांना त्यांची तक्रार पाठवताना त्यांचा अर्ज क्रमांक नमूद करावा लागेल. तक्रारींचे निराकरण केले जाईल आणि गरज पडल्यास, फेज 6 मध्ये परीक्षा देखील घेतल्या जाऊ शकतात.”