AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SPPU : देवा ! साधीसुधी नाही, ‘तिप्पट’ फी वाढवली ! तोडगा काढा नाहीतर ‘तीव्र आंदोलन’ करू, विद्यार्थ्यांकडून इशारा

विद्यापीठाला अनेकदा निवेदनं देऊनही यावर कुठल्याच प्रकारचा तोडगा काढण्यात आलेला नाही त्यामुळे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून आंदोलनाची हाक देण्यात आलीये. विद्यापीठ प्रशासनाला फी वाढीबाबत जाब विचारणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

SPPU : देवा ! साधीसुधी नाही, 'तिप्पट' फी वाढवली ! तोडगा काढा नाहीतर 'तीव्र आंदोलन' करू, विद्यार्थ्यांकडून इशारा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नोकरीची संधीImage Credit source: facebook
Follow us
| Updated on: Apr 27, 2022 | 5:00 PM

मुंबई : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (Savitribai Phule Pune Vidyapeeth) शैक्षणिक शुल्कात वाढ केल्याने विद्यार्थी (Students) आक्रमक झालेत. शैक्षणिक शुल्क जर कमी केलं नाही तर विद्यार्थ्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. विद्यापीठाने शैक्षणिक शुल्कात तिप्पट वाढ केल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. विद्यापीठाला अनेकदा निवेदनं देऊनही यावर कुठल्याच प्रकारचा तोडगा (Solution) काढण्यात आलेला नाही त्यामुळे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून आंदोलनाची हाक देण्यात आलीये. विद्यापीठ प्रशासनाला फी वाढीबाबत जाब विचारणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. त्याचबरोबर फी कमी न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचाही इशारा देण्यात आलेला आहे.

कोरोनाकाळात सगळ्यांचीच आर्थिक घडी विस्कटली. नोकरीचे प्रश्न निर्माण झाले. बेरोजगारी तर वाढलीच पण शासकीय सोडलं तर आहे त्या नोकरीत सुद्धा लोकांचे हाल झाले. पगारपाणी या सगळ्याचीच या काळात बोंब होती. कोरोना काळात शाळा, महाविद्यालयांच्या शुल्कात बदल करण्यात यावेत म्हणून पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी मागणी केली. शाळांसाठी पालकांनी तर मागणी करण्यात आंदोलनं केली आणि खासगी इंग्रजी शाळा आणि सीबीएसई शाळा यांच्या शुल्कात गेल्या वर्षी 10 टक्के सूट देण्यात आली.

शाळांपाठोपाठ शैक्षणिक शुल्क वाढीचा महाविद्यालयांना देखील सामना करावा लागतोय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची झालेली तिप्पट शैक्षणिक शुल्क वाढ बघून आता विद्यार्थी आक्रमक झालेत. फी वाढीमुळे परीक्षा देण्यास अडचणी निर्माण होतात त्यामुळे विद्यापीठाने काय तो निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी विनंती विद्यार्थ्यांकडून करण्यात आलीये.

इतर बातम्या :

प्रेरणादायक! बारावीत नापास झाल्या, अन् वयाच्या 22 वर्षी IAS बनल्या, वाचा अंजू शर्माची कहाणी…

नागपुरात आईची हत्या करून मुलाची आत्महत्या; कुजलेल्या अवस्थेत मिळाले मृतदेह

Diesel Price: मोदींनी कान टोचल्यानंतर आघाडी सरकार डिझेलचे दर कमी करणार; उद्या कॅबिनेटमध्ये प्रस्ताव

भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा.
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी.
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले.
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला.....
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला...
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला....
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी...
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी....
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली.
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका.
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली.
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं..
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं...