DTE Maharashtra 2021 Merit List : डीटीई अभियांत्रिकी पदविका प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करणार , प्रवेश प्रक्रिया नेमकी कशी?

महाराष्ट्र राज्याच्या तंत्रशिक्षण संचलनालयाकडून दहावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची गुणवत्ता यादी आज जाहीर केली जाणार आहे.

DTE Maharashtra 2021 Merit List : डीटीई अभियांत्रिकी पदविका प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करणार , प्रवेश प्रक्रिया नेमकी कशी?
Student
Follow us
| Updated on: Sep 13, 2021 | 2:47 PM

मुंबई: महाराष्ट्र राज्याच्या तंत्रशिक्षण संचलनालयाकडून दहावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची गुणवत्ता यादी आज जाहीर केली जाणार आहे. तंत्रशिक्षण संचलनालयाकडून प्रवर्गनिहाय अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी दहावीनंतर पदविका अभ्यासक्रमांसाठी अर्ज केला आहे. ते विद्यार्थी dtemaharashtra.gov.in या वेबसाईटवर गुणवत्ता यादी पाहू शकतात.

अर्जात दुरुस्ती करण्याची मुदत संपली

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचलनालयाकडून विद्यार्थ्यांना अर्जात दुरुस्ती करण्यासाठी विद्यार्थ्यांना मुदत देण्यात आली होती. 12 सप्टेंबरपर्यंत अर्जात दुरुस्ती करण्यासाठी विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली होती.

DTE Maharashtra 2021 Merit List कुठं पाहायची

स्टेप1: विद्यार्थ्यांनी तंत्र शिक्षण संचलनालयाची वेबसाईट dtemaharashtra gov in वेबसाईटला भेट द्या स्टेप2: पोस्ट एससी डिप्लोमा अ‌ॅडमिशनस 2021-22 टॅबवर क्लिक करा स्टेप3: यानंतर अंतिम गुणवत्ता यादी लिंक वर क्लिक करा स्टेप4: नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख टाकून लॉगिन करा स्टेप5: यानंतर डीटीई महाराष्ट्र मेरिट लिस्ट पीडीएफ डाऊनलोड होईल

ऑनलाईन सबमिशन आणि केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी 13 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. प्रोव्हिजनल अलॉटमेंट लिस्ट 18 सप्टेबरला जाहीर केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश निश्चित करण्यासाठी 23 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. महाविद्यालयांना कागदपत्रांची पडताळणी आणि प्रवेशनिश्चिती ऑनलाईन पद्धतीनं करावी लागणार आहे.विद्यार्थ्यांनी पुढील अपडेटसाठी डीटीईच्या वेबसाईटला भेट द्यावी, असं आवाहन कऱण्यात आलं आहे.

अकरावी प्रवेशाची तिसरी यादी आज जाहीर होणार

अकरावी प्रवेशाच्या तिसऱ्या नियमित फेरीची गुणवत्ता यादी आज जाहीर होणार आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरण, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, अमरावती , नाशिक येथील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश पद्धतीनं सुरु आहे. गुणवत्ता यादीत नाव जाहीर होणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अकरावी प्रवेशाची पहिली आणि दुसरी फेरी यापूर्वीचं पूर्ण झालेली आहे. अकरावी प्रवेशाची पहिल्या फेरीतील गुणवत्ता यादी 27 ऑगस्टला जाहीर झाली होती. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अकरावी प्रवेशाच्या जागा रिक्त राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये जागा रिक्त राहणार

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये यंदाही अकरावीच्या प्रवेशाच्या जवळपास वीस हजारांहून अधिक जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. अकरावी प्रवेशासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील 316 कनिष्ठ महाविद्यालयातील एक लाख 12 हजार 965 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. अकरावी केंद्रीय प्रवेशाच्या पोर्टलवर प्रवेशासाठी केवळ 85 हजार 518 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यातील केवळ 77 हजार 986 विद्यार्थ्यांनी अर्ज लॉक केले आहेत, अशी माहिती आहे.

तिसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी आज जाहीर होणार

अकरावी प्रवेशाच्या तिसऱ्या नियमित फेरीची गुणवत्ता यादी आज जाहीर होणार आहे. पहिल्या पर्यायाचे महाविद्यालय जाहीर होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक असल्याचे शिक्षण संचालक डी. जी. जगताप यांनी सांगितले आहे. तर, अकरावी प्रवेशापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही, पुरेशा जागा उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करावेत, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

इतर बातम्या:

Kirit Somaiya on Deshmukh | अनिल देशमुखांना मुख्यमंत्री आणि शरद पवार वाचवत आहेत : किरीट सोमय्या

‘लाल सिंह चड्ढा’च्या चित्रीकरणाला मुंबईत सुरुवात, दाढी-पगडीमध्ये स्पॉट झाला आमिर खान! पाहा खास लूक…

DTE Maharashtra 2021 Merit List for Post SSC Diploma Final merit List declared today

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.