UGC NET December परीक्षेचा निकाल चेक करण्यासाठी ‘या’ स्टेप्स फॉलो करा
UGC NET December परीक्षेचा निकाल चेक करण्यासाठी तुम्हाला पुढील सोप्या स्टेप्सचा उपयोग होऊ शकतो. UGC NET डिसेंबर 2024 चा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. जे उमेदवार या परीक्षेला बसणार आहेत ते थेट या लिंकद्वारे आपला निकाल पाहू शकतात. यासाठी तुम्हाला ugcnet.nta.ac.in. या वेबसाईटवर जावे लागेल. पुढील प्रक्रिया जाणून घेऊया.

UGC NET डिसेंबर 2024 परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी पुढील माहितीचा तुम्हाला उपयोग होऊ शकेल. विशेष म्हणजे अगदी एका क्लिकवर तुम्ही UGC NET डिसेंबर 2024 परीक्षेचा निकाल तपासू शकता. यासाठी फक्त तुम्हाला पुढील प्रक्रिया जाणून घ्यावी लागेल. याविषयी विस्ताराने वाचा.
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) लवकरच UGC NET डिसेंबर 2024 परीक्षेचा निकाल जाहीर करू शकते. यासोबतच अंतिम उत्तरही जाहीर केले जाऊ शकते. या परीक्षेला बसलेले उमेदवार UGC NET डिसेंबर 2024 परीक्षेचा निकाल हा ugcnet.nta.ac.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुमचा निकाल पाहू शकतात.
एनटीएने अद्याप अधिकृतरित्या निकाल जाहीर करण्याची तारीख जाहीर केलेली नाही, परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. याशिवाय उमेदवार थेट ही लिंक https://ugcnet.nta.ac.in/ तसेच अधिकृत वेबसाइटद्वारे देखील आपला निकाल पाहू शकता. तसेच खाली दिलेल्या या स्टेप्सद्वारे तुम्ही रिझल्ट पाहू शकता.
UGC NET डिसेंबर 2024 परीक्षा डेटशीट
यावर्षी UGC NET परीक्षा 3 जानेवारी ते 27 जानेवारी 2025 दरम्यान देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर 9 वेगवेगळ्या दिवशी आयोजित करण्यात आली होती. यापूर्वी 31 जानेवारी 2025 रोजी तात्पुरते उत्तर जाहीर करण्यात आले होते. उमेदवारांना 3 फेब्रुवारी 2025 पर्यंत उत्तरपत्रिकेवर हरकती नोंदविण्याची संधी देण्यात आली होती. तात्पुरत्या उत्तर तालिकाच्या आधारे निकाल तयार केला जाईल.
UGC NET चा निकाल जाहीर झाल्यापासून 90 दिवसांपर्यंत नोंदी जतन केल्या जातील. पुनर्मूल्यांकन प्रक्रिया उपलब्ध होणार नाही.
UGC NET डिसेंबर निकाल 2024 कसा तपासावा?
UGC NET ugcnet.nta.ac.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा. UGC NET डिसेंबर निकाल 2024 लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा. आवश्यक तपशील प्रविष्ट करा. तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. UGC NET डिसेंबर निकाल 2024 तपासा आणि ते सेव्ह करा.
PhD प्रवेश गुणवत्ता यादी कशी तयार होते?
PhD प्रवेश गुणवत्ता यादी कशी तयार होते? याचं प्रश्नाचं उत्तर पुढे वाचा. नेट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या नेट पर्सेंटाइलला 70 टक्के, तर मुलाखतीला 30 टक्के वेटेज देण्यात येणार आहे. कॅटेगरी 2 आणि कॅटेगरी 3 या दोन्ही कॅटेगरीतील नेट स्कोअर केवळ एका वर्षासाठी वैध असेल. यूजीसी नेट परीक्षा का घेतली जाते?
ज्युनिअर रिसर्च फेलोशिप, असिस्टंट प्रोफेसर आणि पीएचडी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) द्वारे यूजीसी नेट परीक्षा घेतली जाते.