‘इमॅजिन करा, टॉप मॉडेल्सला फक्त तुमच्याकडूनच फोटो काढून घ्यायचेत’, केलं ? आता फोटोग्राफी शिकून घ्या, माहिती वाचा
आज फोटोग्राफी हा केवळ ग्लॅमर करिअरचा पर्याय नाही तर त्यात चांगले नाव आणि पैसे देखील मिळू शकतात. पूर्वी, फोटोग्राफी करणं एका ठराविक वर्गाच्या लोकांसाठीच शक्य होतं, परंतु आता डिजिटल आणि स्वस्त कॅमेर्याच्या सहाय्याने प्रत्येकजण फोटोग्राफी करतोय.
फोटोग्राफी (Photography) या करिअरला (Career) नेहमीच डिमांड असते. आधुनिक व डिजिटल कॅमेरांच्या (Digital Camera) आगमनाने आता पूर्वीपेक्षा फोटोग्राफी जास्त सोपी झाली आहे . बरेच लोकं आवड म्हणून फोटोग्राफी करतात, परंतु जर फोटोग्राफी करिअर म्हणून निवडलं गेलं तर तो एक उत्तम करिअर पर्याय असू शकतो. आज फोटोग्राफी हा केवळ ग्लॅमर करिअरचा पर्याय नाही तर त्यात चांगले नाव आणि पैसे देखील मिळू शकतात. पूर्वी, फोटोग्राफी करणं एका ठराविक वर्गाच्या लोकांसाठीच शक्य होतं, परंतु आता डिजिटल आणि स्वस्त कॅमेर्याच्या सहाय्याने प्रत्येकजण फोटोग्राफी करतोय.
फोटोग्राफीसाठी करिअरची पात्रता
- ज्या लोकांना फोटोग्राफीची आवड आहे त्यांना कोणत्याही प्रकारच्या पात्रतेची आवश्यकता नाही. पण तरीही तुम्हाला यासाठी व्यावसायिक कोर्स करायचा असेल तर बारावीनंतर तुम्ही अनेक प्रकारच्या कोर्समध्ये प्रवेश घेऊन व्यावसायिक फोटोग्राफी शिकू शकता.
- बारावीनंतर फोटोग्राफीचे अनेक डिग्री, डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्सेस आहेत. याशिवाय तुम्हाला फोटोशॉप सारख्या सॉफ्टवेअरचेही ज्ञान असणं आवश्यक आहे या कोर्स मध्ये बरेचदा हे सॉफ्टवेअर देखील शिकवलं जातं ज्यामुळे तुमची फोटोग्राफी कौशल्ये आणखी वाढतात.
फोटोग्राफीच्या ब्रांचेस
अनेक शाखा आहेत फोटोग्राफी मध्ये ज्याला आपण स्पेशलाईजेशन म्हणू शकतो. पण त्यात काही प्रामुख्याने आणि आवर्जून केल्या जातात त्या खालीलप्रमाणे :
- जाहिरात किंवा फॅशन फोटोग्राफी
- कला आणि चित्रपट फोटोग्राफी
- सायन्स किंवा टेकनिक फोटोग्राफी
- वाइल्ड लाईफ एडवेंचर फोटोग्राफी
- फोटो जर्नलिज्म फोटोग्राफी
फोटोग्राफी करताना या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे
- लाइट्स : फोटोचे सौंदर्य त्याच्या लाईट्मधे लपलेले असते . फोटोग्राफीसाठी आपल्याला लाईट माहित असणे आवश्यक आहे. पोर्ट्रेट फोटोग्राफीसाठी मजबूत सूर्यप्रकाश किंवा चमकदार प्रकाश चांगला मानला जात नाही तर लँडस्केप फोटोग्राफीसाठी कमी प्रकाश खराब आहे. फोटो काढण्यासाठी त्या वस्तूवर चांगला प्रकाश असणे महत्वाचे आहे. जर आपल्याला मोकळ्या जागेत फोटोग्राफी करायची असेल तर मध्यम प्रकाश असेल तेव्हा आपण दिवसाची वेळ निवडली पाहिजे.
- फ्रेम रचना : लाईटनंतर लक्षात ठेवण्याची दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फ्रेमिंग. आपल्या फ्रेममध्ये कधीच ऑब्जेक्टसोबत आणखी बर्याच गोष्टी ठेवू नका, यामुळे महत्त्वाचा ऑब्जेक्ट विचलित होईल आणि आपण ज्या गोष्टी दाखविण्याचा प्रयत्न करीत आहात ती इतर गोष्टींमुळे लपवली जाईल. फोटोच्या सौंदर्यासाठी, आपल्याकडे फक्त फ्रेममधील मेन ऑब्जेक्ट असणं महत्त्वाचं आहे कारण अनावश्यक गोष्टी आपला फोटो खराब करू शकतात.
- लॉ ऑफ थर्ड : उभ्या आणि समांतरांच्या मदतीने फ्रेमला नेहमीच तीन भागामध्ये विभाजित करा आणि आपला मुख्य भाग तिथे ठेवा जिथे त्या रेषा एकमेकांना कापत आहेत (गोल्डन पॉईंट्स)
इथे फोटोग्राफीचा कोर्स केला जाऊ शकतो
महाराष्ट्रात अनेक कॉलेजेस मध्ये फोटोग्राफी डिग्री, डिप्लोमा, सर्टिफिकेट कोर्स उपलब्ध आहेत पण देशात काही नामवंत महाविद्यालयं आहेत जी तुम्हाला माहिती पाहिजेत ती खालीलप्रमाणे :
- एजेके मास कम्युनिकेशन सेंटर, जामिया मिलिया इस्लामिया, नवी दिल्ली
- दिल्ली स्कूल ऑफ फोटोग्राफी, दिल्ली
- फिल्म अँड टेलिव्हिजन इंस्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे
- नॅशनल इस्टीट्यूट ऑफ फोटोग्राफी, मुंबई
- इंडियन इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट इन एज्युकेशन अॅण्ड एडवांस्ड स्टडीज, अहमदाबाद